रत्नागिरी-उपसरपंचपदासाठी शिंदे गटात इच्छुकांची भाऊगर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-उपसरपंचपदासाठी शिंदे गटात इच्छुकांची भाऊगर्दी
रत्नागिरी-उपसरपंचपदासाठी शिंदे गटात इच्छुकांची भाऊगर्दी

रत्नागिरी-उपसरपंचपदासाठी शिंदे गटात इच्छुकांची भाऊगर्दी

sakal_logo
By

उपसरपंचपदासाठी शिंदे गटातच चुरस
रत्नागिरी, ता. ८ : शिरगाव ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बुधवारी (ता. ९) होणाऱ्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटातील इच्छुकांची भाऊ गर्दी झाल्याने उपसरपंचपदाचा पेच निर्माण झाला आहे. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी शिंदे गटाचे सर्वांत जास्त सदस्य निवडून आल्याने उपसरपंचपदावर शिंदे गटाचा दावा आहे. मात्र चार ते पाच इच्छुक असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून शिरगाव ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. गेले दोन महिने सर्वत्रिक निवडणुकीमुळे या ग्रामपंचयातीमध्ये राजकीय धुरळा उडला.