चिपळूण ः कोयना धरणाच्या बोगद्याला गळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः कोयना धरणाच्या बोगद्याला गळती
चिपळूण ः कोयना धरणाच्या बोगद्याला गळती

चिपळूण ः कोयना धरणाच्या बोगद्याला गळती

sakal_logo
By

पान १ साठी

कोयना धरणाच्या बोगद्याला गळती
पाणी कातळातून येते; धरण, वीजनिर्मिती केंद्रही सुरक्षित असल्याचा निर्वाळा
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याला गळती लागली आहे. गेली पाच वर्ष ही गळती सुरू आहे. गळतीमुळे दिवसा हजारो लिटर पाणी वाया जात आहे; मात्र कोयना धरण किंवा वीजनिर्मिती प्रकल्पाला धोका नाही, असा खुलासा कोयना प्रकल्पाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी केला आहे.
कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून जे अधिजल भुयार निघते या बोगद्याच्या शेवटी एक सर्जवेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाबाने बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल १९६० ला बांधून पूर्ण झाली आहे. डोंगरातील कातळ फोडून ही विहीर बांधलेली असून ती कातळात १०० मीटर खोल खोदलेली आहे. त्याला अर्ध्या मीटर रुंदीचे काँक्रिट अस्तरीकरण केलेले आहे. साठ वर्ष या भिंतीने भूकंपाचे अनेक धक्के पचवलेले आहेत; मात्र आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्जवेलमधून हे झिरपलेलं पाणी इमर्जन्सी व्हॅाल्व्ह टनेल किंवा आपत्कालीन झडपद्वार भुयारमध्ये जाते आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडते. या पाण्यामुळे वीजगृहाला जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही केवळ पाणी वाया जात आहे एवढेच नुकसान आहे. हे पाणीसाधारण तीन घनफूट प्रतिसेकंद एवढे असण्याची शक्यता आहे. उपळी सर्जवेलची जागा अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्यामुळे तिथे मशिनरी नेऊन दुरुस्ती करणे सहजसोपे नाही. दुरुस्तीसाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लागेल आणि दुरुस्ती केवळ उन्हाळ्यातच शक्य आहे. या सर्व कारणांमुळे गेली चार-पाच वर्षे दुरुस्तीचे काम रेंगाळलेले आहे. यात घाबरण्यासारखी किंवा गोंधळल्यासारखी कोणतीही स्थिती नाही, असे मोडक यांनी सांगितले.


गळती काढण्यासाठी हालचाल नाही
कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याला पाच वर्षांपूर्वी गळती लागली. जलसंपदा खात्याचे सेवानिवृत मुख्य अभियंता दीपक मोडक यांचे कोयना प्रकल्पाच्या उभारणीत मोठे योगदान असल्यामुळे ही गळती थांबवण्यासाठी मोडक यांना मार्गदर्शनासाठी पाचारण केले. पाच वर्षांपूर्वी मोडक यांनी काही उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यानुसार पाणबुडे विहिरीत सोडले त्यांनी गळतीचे ठिकाणही शोधून काढले होते; मात्र अद्याप ही गळती काढण्यासाठी कोणतीही हालचाल दिसत नाही.

कोट
बोगद्याला लागलेली गळती कशा पद्धतीने काढता येईल याचे नियोजन झाले आहे. गळती काढण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आमचा पाठपुरावा सुरू आहे. गळतीचे पाणी कातळातून येत आहे. नागरिकांनी घाबरण्यासारखे काहीच नाही.
- वैभव फालके, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयना