मारहाणप्रकरणी चारजणांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाणप्रकरणी चारजणांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल
मारहाणप्रकरणी चारजणांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल

मारहाणप्रकरणी चारजणांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल

sakal_logo
By

मारहाणप्रकरणी चारजणांवर
अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल
रत्नागिरी, ता. ८ः शहरातील आरोग्य मंदिर येथील एका बॅंकेच्यासमोर तरुणीच्या नावे कर्ज काढल्याच्या गैरसमजातून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरुद्ध शहर पोलिसात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे.
श्रीमती घुडे, गणेश शिंदे व त्यांचा मित्र आणि एक पोलिस कॉन्स्टेबल (पूर्ण नाव, पत्ता नाही) असे संशयित आहेत. ही घटना सोमवारी (ता. ७) सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील आरोग्यमंदिर येथील एचडीएफसी बॅंकेच्यासमोर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेश विठोबा जाधव (वय ४४, रा. बौद्धवाडी-सोमेश्वर, ता. रत्नागिरी) हे सकाळी ११ वाजता शिवानी मेणे यांच्या परिवारास वडापाव घेऊन गेले होते. सायंकाळी जाधव हे शिवानी हिला घेऊन आरोग्यमंदिर येथील एचडीएफसी बॅंकेत आले होते. शिवानीची आर्थिक फसवणूक करणार असल्याच्या संशयावरून संशयित महिलाही तिच्या मागावर होती तसेच अन्य व्यक्तीही होत्या.
जाधव शिवानीला घेऊन बॅंकेत गेले तेव्हा तिची मैत्रीण आणि तिचे सहकारी बॅंकेत आले. त्यांना पाहून पैसे न काढता तो बाहेर आला. मी कर्ज काढल्याचा गैरसमज करून काढलेली रक्कम माझ्याकडे मागण्यास सुरवात केली. जाधव यांनी मी रक्कम अथवा कर्ज काढलेले नाही, असे सांगूनही संशयितांनी शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरवात केली. या वेळी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस कॉन्स्टेबलनेही मारहाण केली. या प्रकरणी नरेश जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनीअनुसूचित जाती जमाती अधिनियम अन्वये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे करत आहेत.