दोन कंपन्या स्थानिक पुढाऱ्यांनी विकून खाल्ल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन कंपन्या स्थानिक पुढाऱ्यांनी विकून खाल्ल्या
दोन कंपन्या स्थानिक पुढाऱ्यांनी विकून खाल्ल्या

दोन कंपन्या स्थानिक पुढाऱ्यांनी विकून खाल्ल्या

sakal_logo
By

लोटेत दोन कंपन्या स्थानिक
पुढाऱ्यांनी विकून खाल्ल्या
रामदास कदम यांचा घणाघात ; २०० कोटींचे भंगार फस्त
खेड, ता. ८ ः लोटे एमआयडीसीमधील मिसाळ या कंपनीसह अन्य एका बंद कंपनीमधील सुमारे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचे भंगार लोटेमधील काही स्थानिक पुढाऱ्यांनी विकून खाल्ले असल्याचा आरोप माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत केला.
लोटेमधील मिसाळ या कंपनीसह अन्य एक कंपनी बंद आहे. याचाच फायदा स्थानिक पुढाऱ्यांनी उचलून यंत्रसामुग्री जेसीबीसारखी यंत्रे लावून जमा केली, भंगार विकून खाल्ले. त्यामुळे कंपनी जाग्यावरच नसल्याची गंभीर बाब या वेळी कदम यांनी माध्यमासमोर मांडली. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनदेखील कोणतीच कारवाई झाली नाही. यामुळे आता थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून याची सीआयडी चौकशीची मागणी करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
दरम्यान, बंद असलेली कंपनी मालक याची ५ एकर जमिनीला बनावट प्रतिज्ञापत्र तयार करत कुळ लावून जमीन लाटण्याचा प्रकारदेखील उघड झाला असून याबाबत देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल मागवणार असल्याचे कदम यांनी सांगितले. याबाबत बनावट प्रतिज्ञापत्राची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. आजपासून गुहागर मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. गुहागर मतदारसंघातील गाववाड्यात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा जाणून घेऊन विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे कदम यांनी सांगितले.