कुलसुम अन्सारी खूनप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुलसुम अन्सारी खूनप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी
कुलसुम अन्सारी खूनप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी

कुलसुम अन्सारी खूनप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By

कुलसुम अन्सारी खूनप्रकरणी
संशयिताला न्यायालयीन कोठडी
चिपळूण, ता. ८ः पेठमाप येथील कुलसुम अन्सारी या महिलेच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या आदेश किसन आदवडे (वय २८) याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शहरातील पेठमाप येथे राहणारी कुलसुम अन्सारी या महिलेचा मृतदेह ३१ ऑक्टोबरला आढळून आला होता. पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावला आणि पेठमाप येथील आदेश किसन आदवडे या तरुणाला या प्रकरणात अटक केली. त्याने आता खुनाची कबुली दिली आहे. कुलसुम अन्सारी ज्या घरात राहत होती त्या घरासमोर काही तरुण रोज सायंकाळी बसत होते. हळूहळू महिला आणि त्या तरुणांमध्ये बाचाबाची, टोले टोमणे आणि मग शिवीगाळ असे प्रकार घडू लागले. त्यामुळे द्वेष व मत्सर वाढला. राग अनावर झाला. त्यातच मद्याचा अंमल असल्याने हा प्रकार घडला अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या आदेश आदवडे या संशयिताची पोलिस कोठडी मंगळवारी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता हा खून त्याने एकट्यानेच केला की त्याच्याबरोबर अन्य कोण साथीदार होते? तो सांगत असलेले कारण सत्य आहे का की आणखी वेगळे कारण आहे? याबाबत पोलिस तपास करत आहेत.