आल्मेडा मृत्यूप्रकरणी आणखी एक अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आल्मेडा मृत्यूप्रकरणी
आणखी एक अटकेत
आल्मेडा मृत्यूप्रकरणी आणखी एक अटकेत

आल्मेडा मृत्यूप्रकरणी आणखी एक अटकेत

sakal_logo
By

आल्मेडा मृत्यूप्रकरणी
आणखी एक अटकेत
मालवण, ता. ८ : रेवतळे येथील खलाशी अंतोन सालू आल्मेडा मृत्यूप्रकरणी येथील पोलिसांनी यापूर्वी तिघांना अटक केली असताना पसार असणाऱ्या अन्य दोन संशयितांपैकी अमित दिलीप पेडणेकर (वय ३५) याला आज अटक करण्यात आली. प्रकृतीच्या कारणास्तव त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मासेमारीस गेल्यावर समुद्रात बेपत्ता होऊन नंतर निवती समुद्रात मृतदेह सापडलेल्या रेवतळे येथील खलाशी अंतोन आल्मेडा यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नीने घातपाताचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी लहू भिकाजी जोशी (४८ रा. दांडी, श्रीकृष्णवाडी), नंदकिशोर लक्ष्मण मोंडकर (४५ रा. मोरेश्वरवाडी, वायरी-भूतनाथ), मार्शल कोजमा डिसोझा (५२ रा. मच्छीमार्केट, सोमवार पेठ, मालवण) या तिघांना अटक केली होती. या तिघांना न्यायालयाने प्रथम पोलिस कोठडी सूनावल्यानंतर यापैकी लहू जोशी व नंदकिशोर मोंडकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ केली होती. तर मार्शल डिसोझा याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. लहू जोशी व नंदकिशोर मोंडकर यांची पोलिस कोठडी आज संपल्यानंतर दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या प्रकरणातील अन्य दोन संशयित पसार झाले असताना पोलिसांनी यापैकी अमित पेडणेकर या संशयितास आज अटक केली. प्रकृतीच्या कारणास्तव त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.