कणकवली : चेतना यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : चेतना यात्रा
कणकवली : चेतना यात्रा

कणकवली : चेतना यात्रा

sakal_logo
By

भारतीय मजदूर संघाची चेतना यात्रा
कणकवली ः भारतीय मजदूर संघाच्या वतीने चेतना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गामध्ये १२ नोव्हेंबर सकाळी १० वाजता ही चेतना यात्रा वैभववाडी येथून कणकवली ते विविध तालुक्यांमध्ये मार्गस्थ होणारा आहे. याचे नियोजन सध्या सुरू झाले आहे. भारतीय मजदूर संघाच्या वतीने येत्या २१ डिसेंबर रोजी लक्षवेधी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध समस्यांसाठी हा मोर्चा आहे. या मोर्चाबाबतची जनजागृती व्हावी म्हणून चेतना यात्रा १२ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता वैभववाडी येथून कणकवलीमध्ये दाखल होणार आहे. विविध क्षेत्रांतील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांबाबत हा मोर्चा असणार आहे. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून १७ नोव्हेंबरपर्यंत ही चेतना यात्रा जिल्ह्यातील विविध ठिकाणी फिरणार आहे. या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत होणार आहे. यात्रा जिल्ह्यांमध्ये जाणार असून त्यानंतर २१ डिसेंबरला मुंबईतील लक्षवेधी मोर्चामध्ये ही यात्रा सहभागी होईल.