जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत पावशीचा ‘सखी’ संघ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत
पावशीचा ‘सखी’ संघ प्रथम
जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत पावशीचा ‘सखी’ संघ प्रथम

जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत पावशीचा ‘सखी’ संघ प्रथम

sakal_logo
By

61282
अणसूर : सखी फुगडी संघाला गौरविताना मान्यवर.

जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत
पावशीचा ‘सखी’ संघ प्रथम
कुडाळ, ता. ८ ः श्री देवी सातेरी कला, क्रीडा मंडळ अणसूर (ता. वेंगुर्ले) आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत सखी फुगडी संघ पावशी-कुडाळने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाला मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
श्री देवी सातेरी मंदीर अणसूर येथे नुकताच संगीत महोत्सव २०२२ पार पडला. यानिमित्त मंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा आणि वारकरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फुगडी स्पर्धेत १५, तर वारकरी भजन स्पर्धेत ७ संघांनी सहभाग घेतला. फुगडी स्पर्धेत पावशीच्या सखी फुगडी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना पारितोषिक वितरीत करून गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सखी फुगडी संघातून दीप्ती ढवण, विद्या गोसावी, प्रियांका गोसावी, करिष्मा गोसावी, संजना गोसावी, सानिका गोसावी, रोहिणी गोसावी, सानिका तवटे, रिया तवटे, श्रेया तवटे, प्रचिती तांबे, श्रद्धा जुवेकर, करिष्मा राऊळ, स्नेहा कुंभार यांनी फुगडी कला सादर करून वाहवा मिळविली. त्यांना ढोलकी साथ प्रथमेश धुरी यांनी दिली.