सावंतवाडी राजघराण्याची राहुल नार्वेकरांनी घेतली भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी राजघराण्याची
राहुल नार्वेकरांनी घेतली भेट
सावंतवाडी राजघराण्याची राहुल नार्वेकरांनी घेतली भेट

सावंतवाडी राजघराण्याची राहुल नार्वेकरांनी घेतली भेट

sakal_logo
By

61287
सावंतवाडी ः राजघराण्याची भेट घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर.

सावंतवाडी राजघराण्याची
राहुल नार्वेकरांनी घेतली भेट

सावंतवाडी, ता. ९ ः जागेअभावी रेंगाळलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न सुटावा, यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी येथील राजघराण्याची भेट घेतली. यावेळी राजघराण्याची सहकार्याची भूमिका मोलाची आहे. सावंतवाडीत होणाऱ्या हॉस्पिटल मार्गी लावण्यासाठी स्वतः प्रयत्न करेन, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष तथा सावंतवाडीचे सुपुत्र राहुल नार्वेकर यांनी येथे व्यक्त केला.
यावेळी युवराज लखमराजे यांच्या संकल्पनेतून राजवाड्यात सुरू होत असलेल्या पंचतारांकीत हॉटेलला त्यांनी भेट दिली. अशा प्रकारे पर्यटनाभिमुख प्रकल्प होणे गरजेचे आहेत आणि त्यासाठी कायम सहकार्य असेल, असे त्यांनी सांगितले. नार्वेकरांनी सावंतवाडी दौऱ्यावर असताना येथील राजवाड्याला भेट दिली. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांच्याहस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले, श्रध्दाराणी भोसले आदी उपस्थित होते. यावेळी नार्वेकर यांनी, आपण सावंतवाडी संस्थानाचे नातेवाईक लागतो. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबरोबर सावंतवाडीला भेडसावणारे प्रश्न सोडवू, असे अभिवचन दिले.