टिपऱ्यांसह तलवार फिरवण्याची परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिपऱ्यांसह तलवार फिरवण्याची परंपरा
टिपऱ्यांसह तलवार फिरवण्याची परंपरा

टिपऱ्यांसह तलवार फिरवण्याची परंपरा

sakal_logo
By

(टुडे पान १ साठी)

फोटो ओळी
-rat९p१५.jpg ः
६१२७७

पावस ः गोळप येथील हरिहरेश्वर मंदिरामध्ये कार्तिक उत्सवामध्ये पट्टा चालवण्याचा खेळ खेळताना भाविक.

टिपऱ्यांसह पट्टा फिरवण्याची परंपरा

गोळपमधील हरिहरेश्वर मंदिर ; कार्तिकोत्सव उत्साहात

पावस, ता. ९ ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे श्री हरिहरेश्वर मंदिराचा कार्तिकोत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदेपर्यंत असतो. येथील उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक भोवत्या, टिपऱ्या आणि पट्टे म्हणजे तलवार फिरवणे. यावर्षीही हा उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
हे मंदिर खूप प्राचीन असून उत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष आहे. उत्सवामध्ये टिपऱ्या आणि पट्टेही उत्सवातील कुठेही न आढळणारी परंपरा आजही जपली जाते. टिपऱ्यांची गाणी ही विशिष्ट आहेत. तसेच पट्टा मारण्याचा तबल्याचा ठेकाही विशिष्ट आहे. पट्टा म्हणजे तलवारी. या एका हाताने आणि दोन्ही हातांनी खेळल्या जातात. उत्सवात अंतर्भूत असलेले हे खेळ परंपरेने चालत आले आहेत आणि आताच्या पिढीने सुरू ठेवले आहेत. त्यामुळे या उत्सवामध्ये वेगळेपण दिसून येते. साहजिकच या उत्सवाला परिसरातील अनेक लोक आवर्जून भेट देतात आणि उत्सवाचा आनंद लुटतात.
पूर्वीच्या काळी खेळ खेळण्याची परंपरा होती आणि त्या माध्यमातून शारीरिक व बौद्धिक पातळी वाढण्यास मदत होत असे. या खेळांच्या माध्यमातून स्वसंरक्षणाची गती प्राप्त होत असल्यामुळे त्या खेळाकडे विशेष लक्ष दिले जात होते. साहजिकच उत्सवांच्या माध्यमातून पट्टा चालवण्याचे खेळाचे प्रकार अग्रक्रमाने होत असतात. या बदलत्या काळात या भावी पिढीला पट्टा चालवण्याचे खेळ समजावेत, ती कला जोपासता यावी या दृष्टिकोनातून कार्तिक उत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने पट्टा चालवण्याचे खेळ आजही खेळले जातात. याचा उद्देश समजून घेतल्यास भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, असे सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी सांगितले.