नाथ पै हॉल, स्विमिंग पूल खुला करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाथ पै हॉल, स्विमिंग पूल खुला करा
नाथ पै हॉल, स्विमिंग पूल खुला करा

नाथ पै हॉल, स्विमिंग पूल खुला करा

sakal_logo
By

61285
सावंतवाडी : प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याशी चर्चा करताना पुंडलिक दळवी व पदाधिकारी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


नाथ पै हॉल, स्विमिंग पूल खुला करा

सावंतवाडी राष्ट्रवादीची मागणी ः प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः शहरात दिमाखात उद्‍घाटन झालेले स्विमिंग पूल तत्काळ सुरू करण्याबरोबर अपुऱ्या अवस्थेत असलेला बॅ. नाथ पै हॉलचे काम पूर्ण करून तो नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक प्रशांत पानवेकर यांच्याकडे केली.
सावंतवाडी पालिकेने दोन वर्षांपूर्वी उद्‍घाटन केलेला स्विमिंग पूल अद्यापही वापराविना बंद आहे. मोठा निधी खर्च करून नव्याने स्विमिंग पुलाचे काम करण्यात आले; मात्र तो बंद असल्याने नागरिकांना उन्हाळ्यात शहराबाहेर स्विमिंगसाठी जावे लागते. एकूणच याबाबत प्रशासनाच्या विरोधात नागरिकांची नाराजी आहे. दुसरीकडे सद्यस्थितीत लग्नसराई सुरू झाली आहे. पालिकेच्या मालकीचा बॅ. नाथ पै हॉल दुरुस्तीच्या नावाखाली दोन वर्षे बंद आहे. हॉलचे काम शीघ्रगतीने पूर्ण करून तो माफक दराने नागरिकांना उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो; मात्र याबाबत काहीच हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे ही दोन्ही कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी प्रांत पानवेकर यांच्याकडे केली. शहरात रोज कचरा गोळा करणाऱ्या गाड्या आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ कराव्यात, अनधिकृतरित्या गटरात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत कार्यवाही हाती घ्यावी, शहरातील मोती तलावाचा पदपथ कोसळून बरेच दिवस उलटले; मात्र त्याच्या डागडुजीबाबत काहीच उपाययोजना होताना दिसून येत नाही.
---
प्रवेशद्वारावरच कचरा
शहराच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून याबाबत प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी आदी विविध विषयांवर चर्चा केली. ही कामे मार्गी न लागल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रवादीकडून देण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष राजगुरू आदी उपस्थित होते.
---------
कोट
येत्या पंधरा दिवसांत स्विमिंग पूल सर्वांसाठी खुला करण्यात येईल. त्याबाबत हालचाली सुरू आहेत. अन्य प्रश्नांबाबत योग्य ते पाऊल उचलू.
- प्रशांत पानवेकर, प्रांताधिकारी तथा पालिका प्रशासक, सावंतवाडी