नांदूरूख येथे आज जत्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदूरूख येथे 
आज जत्रोत्सव
नांदूरूख येथे आज जत्रोत्सव

नांदूरूख येथे आज जत्रोत्सव

sakal_logo
By

नांदरुख गिरोबाचा
आज जत्रोत्सव
कणकवली ः मालवणसह एकूण सात गावांची मूळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुख गावच्या जागृत श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. १०) होणार आहे. आकर्षकरित्या सजविलेल्या पालखी आगमनासमयी ढोल-ताश्यांच्या गजरात डोळ्यांची पारणे फेडणारी फटाक्यांची विविध रंगी नयनरम्य आतषबाजी हे या जत्रेचे खास आकर्षण असते. जत्रोत्सवादिनी रात्री साडेनऊला सजविलेल्या पालखीचे ढोलताश्यांच्या गजरात मंदिरात आगमन होते. मंदिरात ओटी भरण्याचा विधी आटोपल्यानंतर पालखी प्रदक्षिणा सुरू होते. रात्री वालावलकर दशावतारी नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे.
--------
माईणला रास्त
धान्य दुकान
कणकवली ः माईण (ता.कणकवली) येथे रास्त भाव धान्य दुकानाचे उद्‍घाटन तहसीलदार रमेश पावर यांच्या हस्ते झाले. यापुर्वी गावातील शिधापत्रक धारणांना धान्यसाठी ओटव येथे जावे लागत होते. त्यामुळे माजी सरपंच शामसुंदर पाडावे आणि प्रशांत कामतेकर यांनी गावात दुकान मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न केला. प्रकाश कामतेकर यांना हे दुकान मंजूर झाले.
---
कुबल यांचा
वेंगुर्लेत सन्मान
वेंगुर्ले ः येथील पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल यांना नवी मुंबई येथील महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या संस्थेतर्फे ‘दी प्राईड ऑफ महाराष्ट्र : एमजेएफ अ‍ॅवॉर्ड’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. यानिमित्त वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विधाता सावंत, माजी नगरसेविका कृतिका कुबल आदी उपस्थित होते.
---
कोलगाव सातेरी
जत्रोत्सव आज
ओटवणे ः कोलगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवस्थानचा जत्रोत्सव उद्या (ता. १०) होणार आहे. यानिमित्त रात्री कुळ व थळ घराकडून सवाद्य तरंग काठीसह पालखी निघणार आहे. रात्री ११ सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर मध्यरात्री एकला पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन देवस्थान कमिटी अध्यक्ष चंदन धुरी व सर्व मानकऱ्यांनी केले आहे.