पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करा
पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करा

पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करा

sakal_logo
By

(पान २ साठी)

फोटो ओळी
- rat९p२०.jpg-
६१३१९
मुंबई ः पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण.
-----------
रत्नागिरी पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करा

मनोज चव्हाण यांची मागणी ; पालकमंत्री सामंतांबरोबरच चर्चा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः रत्नागिरी पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करावा, अशी मागणी मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे भौगोलिक निसर्गसौंदर्य पाहता अनेक पर्यटक इथे येतात. पायाभूत सुविधांचा आभाव पाहता अनेकजण रत्नागिरीत जास्त कालावधीसाठी न थांबता गोव्याकडे जातात. नेमके याच गोष्टींचा आढावा घेत मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा केली. राज्याच्या एकूण ७२० किमीचा समुद्रकिनाऱ्‍यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला १८० किमीचा किनारा लाभला आहे. त्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला रोजगारासाठी उपयोग करून घ्यायचा असेल तर येथे पायाभूत सुविधा, साहसी जलक्रीडा आदी सुविधांची उभारणी करणे गरजेचे आहे. पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यास त्याला उभारण्यात अत्यंत सुलभता येऊ शकते. याबाबत झालेल्या विस्तृत चर्चेप्रसंगी मंत्री सामंत अनुकूल होते. त्यांनी या वेळी तांत्रिक अडचणही दाखवून दिली. रत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. केंद्राकडून एकाच जिल्ह्याला असे दोन मानांकन देता येऊ शकत नाहीत, ही अडचण असल्याचे सांगितले. यावरही आपण बसून सुवर्णमध्य काढू व रत्नागिरी जिल्हा हा पर्यटन व्यवसायात अग्रेसर करू, असे आश्‍वासन मंत्री सामंत यांनी दिले. यासाठी लवकरच एक बैठक आयोजित करू, असेही त्यांनी सांगितले.