मालवणातील प्रश्न सोडविण्यावर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणातील प्रश्न सोडविण्यावर भर
मालवणातील प्रश्न सोडविण्यावर भर

मालवणातील प्रश्न सोडविण्यावर भर

sakal_logo
By

61333
मालवण ः येथील पेट्रोल पंपनजीकच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ कार्यालयाचे उद्‍घाटन करताना माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत.

मालवणचे प्रश्न सोडविण्यावर भर

ब्रिगेडियर सावंत ः ‘बाळासाहेबांची शिवसेना’ कार्यालयाचे उद्‍घाटन

मालवण, ता. ९ ः माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यानंतर जनहिताचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे होय. जनतेला न्याय देणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला हे जनतेचे भाग्य आहे. येत्या काळात तालुक्यातील मच्छिमार, पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या, ग्रामीण रोजगार, समृद्ध गाव संकल्पना राबविण्याबरोबरच बचतगटांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज येथे केले.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पेट्रोलपंप नजीकच्या मालवण कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सिंधुरत्न समृद्ध योजना समिती सदस्य किरण सामंत, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत आज झाला. यावेळी संजय आंग्रे, बबन शिंदे, महेश राणे, राजा गावकर, विश्वास गावकर, भूषण परुळेकर, किसन मांजरेकर, जगदीश सामंत, ऋत्विक सामंत, संदेश पटेल, महेश सामंत, अनुप्रीती खोचरे, वर्षा कुडाळकर, अनघा रांगणेकर, सुनील पारकर, महेंद्र सावंत, उल्हास तांडेल, पराग खोत, बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, राजा तोंडवळकर, शेखर तोडणकर, धीरज केळुसकर, दादा वेंगुर्लेकर, अश्विन हळदणकर, भरत शिरूरकर, पिंकू मोरे, किरण कारेकर, रमेश बेलवलकर, चेतन सकपाळ, दीपक मिठबावकर, डॉ. जितेंद्र केरकर, दिव्या कोचरेकर, रिया आचरेकर, मीनल आचरेकर, भारती घारकर, लुद्दीन फर्नांडिस, शबनम शेख, तस्लिम शेख, वैशाली वाडेकर, कविता गावकर, शाईन शेख, पूजा नारिंग्रेकर, नंदिनी केसरकर, प्रिया चव्हाण, श्वेता तोडणकर, रसिका राऊळ, करण तोडणकर, अक्षय मेतर, गोपाळ शेलटकर, आशिष नाबर, गोविंद पेडणेकर आदी उपस्थित होते.