कोकणात वानर, माकडांचा उपद्रव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात वानर, माकडांचा उपद्रव
कोकणात वानर, माकडांचा उपद्रव

कोकणात वानर, माकडांचा उपद्रव

sakal_logo
By

कोकणात वानर,
माकडांचा उपद्रव
दाभोळ ः कोकणातील ग्रामीण भागात वानर व माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे दिवसेंदिवस शेती करण्याचे प्रमाण कमी होत आहे. ग्रामीण भाग भात, नाचणी, वरी, फळभाज्या, कुळीथ, उडीद या पिकांसाठी प्रसिद्ध आहे; मात्र वानर व माकडांच्या त्रासाला कंटाळून शेतकरी शेती सोडू लागला आहे. कोकणात आंबा, काजू, चिकू, केळी, रामफळ, नारळ, सुपारी या बागायतीमध्येसुद्धा माकडे आक्रमण करून येथील शेतकर्‍याला हैराण करत आहेत. ग्रामीण भागात शेतकरी किंवा नागरिक खूप कष्ट करून फळबागा फुलवतात; मात्र माकडांच्या त्रासामुळे त्यांचे लाखमोलाचे कष्ट वाया जात आहेत. कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही कारण, येथे एक पिकाऐवजी बहुपीक पद्धत आहे. कोकणात विविध हंगामानुसार वेगवेगळी पिके घेतली जातात. त्यामुळे उपद्रवी म्हणून जाहीर नसलेल्या प्राण्यांना आळा घालणे गरजेचे आहे.