पान एक-चेक पोस्ट पुन्हा सुरु होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-चेक पोस्ट पुन्हा सुरु होणार?
पान एक-चेक पोस्ट पुन्हा सुरु होणार?

पान एक-चेक पोस्ट पुन्हा सुरु होणार?

sakal_logo
By

61391

चेक पोस्ट पुन्हा सुरू होणार?
नूतन पोलिस अधीक्षकांकडून संकेत; अवैध धंदे रोखण्यास प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः जिल्ह्यातील बंद केलेले चेक पोस्ट पुन्हा कार्यरत करण्याचे संकेत नूतन पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी आज दिले. चेकपोस्ट नसल्याने अवैध धंद्यांना वचक राहिला नाही. त्यामुळे पोलिस कर्मचारी यांचे नियोजन करून चेक पोस्ट सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी मुख्यालय पत्रकार संघाने घेतलेल्या भेटी दरम्यान दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत माहिती अग्रवाल यांनी जाणून घेतली. ते म्हणाले, ‘‘मी सध्या जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना भेटी देत आहे. यातून जिल्हा समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानंतर कोणत्या ठाण्यात गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे? कोणत्या प्रकारचे गुन्हे जास्त आहेत, याचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात येणार आहेत.’’
या वेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मनुष्यबळ, वाहनांची कमतरता
जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आपण उपलब्ध यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी आवश्यक मनुष्यबळ आणि वाहनांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचा काहीसा परिणाम कामकाजावर होत असल्याचे मान्य करीत अग्रवाल यांनी असलेल्या यंत्रणेतून जिल्ह्यातील क्राईम रोखण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे सांगितले


मीडियाशी कनेक्ट राहणार
मागील काही कालावधी जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिस यंत्रणेकडून दिली जात नव्हती. दिली असली तर ती उशिराने दिली जात होती. याबाबत पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर ते म्हणाले, ‘‘एफआयआरमध्ये नोंद झालेली माहिती देण्यास कोणतीही अडचण नाही. कारण ती माहिती सार्वजनिक असते. घडलेल्या गुन्ह्याची माहिती वेळेत दिली जाईल. मीडियापासून कोणतीही माहिती लपविली जाणार नाही.’’

कोट
सिंधुदुर्गात होत असलेल्या चोऱ्या, उफाळलेले अवैध धंदे, तसेच गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. पुढील क्राईम सभेत मी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेशी याबाबत चर्चा करणार आहे. मात्र, गुन्हे रोखण्यासाठी घडलेल्या गुन्ह्याची उकल करणे हाच एकमेव पर्याय आहे. माझ्या कार्यकाळात गुन्ह्यांतील आरोपींना जेरबंद करण्यावर भर राहणार आहे."
- सौरभकुमार अग्रवाल, पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग