पद्माश्री पुरस्कार चंद्रकांत वाघुळदे यांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पद्माश्री पुरस्कार चंद्रकांत वाघुळदे यांना
पद्माश्री पुरस्कार चंद्रकांत वाघुळदे यांना

पद्माश्री पुरस्कार चंद्रकांत वाघुळदे यांना

sakal_logo
By

(पान २ साठीमेन)

(टीप- पुरस्काराचे नाव पद्माश्री असेच आहे, पद्मश्री नाही.)

फोटो ओळी
-rat९p१.jpg
६१२६३
रत्नागिरी ः अमेय पोतदार, डॉ. चंद्रकांत वाघुळदे, डॉ. अमरनाथ स्वामी.


डॉ. चंद्रकांत वाघुळदेंना चैतन्य ज्योतिष मंडळाचा पद्माश्री पुरस्कार

रविवारी वितरण ; कार्यगौरव अमेय पोतदार, चैतन्य भूषण डॉ. स्वामी यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः श्री चैतन्य ज्योतिष अभ्यासमंडळाचा पद्माश्री पुरस्कार ज्योतिर्विद डॉ. चंद्रकांत वाघुळदे, कार्यगौरव पुरस्कार विशेष कारागृहाचे तुरुंग अधिकारी अमेय पोतदार आणि (कै.) कविभूषण पाटणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिला चैतन्य भूषण पुरस्कार कोल्हापूरचे डॉ. अमरनाथ स्वामी यांना जाहीर करण्यात असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न मुळ्ये यांनी दिली. पुरस्कार वितरण रविवारी (ता. १३) दुपारी ३ ते ८ या वेळेत जे. के. फाईल्स येथील साईमंगल कार्यालयात होणार आहे.
प्रमुख पाहुणे पं. अतुलशास्त्री भगरेगुरूजी, उद्घाटक ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार आणि अॅड. मालती शर्मा विशेष उपस्थित राहणार आहेत. या वेळी पदवीदान समारंभ होईल. शनीपिडा उपाय व उपासनेवर प्रिया मालवणकर, लक्ष्मीप्राप्तीच्या उपायांवर अंजली पोतदार आणि मंगळ ग्रह व कुजस्तंभावर अमर लवांघरे व्याख्यान, नैमिष्यारण्यातील अमृतानुभवावर पं. भगरे गुरूजी बोलतील. डॉ. प्रसन्न मुळ्ये वार्षिक राशीभविष्य सांगतील.
डॉ. वाघुळदे यांनी ज्योतिषप्रवीण, ज्योतिष विशारद, रमल विशारद, अष्टकवर्ग भूषण, कृष्णमूर्ती विशारद, वास्तूशास्त्र विशारद आदी अनेक पदव्या मिळवल्या. ओंकारेश्वर विश्वविद्यापीठ (मध्यप्रदेश) येथून डॉक्टर ऑफ वास्तू सायन्स आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातून (रामटेक) वेदांग ज्योतिषावर पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात ज्योतिषविषयक व्याख्याने दिली असून ते विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत.
चैतन्य भूषण पुरस्कार डॉ. अमरनाथ स्वामी यांना जाहीर झाला आहे. त्यांनी ज्योतिषप्रवीण, ज्योतिष विशारद, ज्योतिष भास्कर, वास्तू रेमिडी पंडित अशा अनेक पदव्या प्राप्त केल्या. बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळामार्फत ज्योतिर्विद्या वाचस्पती या पदवीनेदेखील त्यांचा सन्मान झाला आहे. ज्ञानगंगा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना ज्योतिषशास्त्राचे प्रशिक्षण दिले आहे.


सावरकर स्मारकाचे पुनरुज्जीवन
कार्यगौरव पुरस्कार अमेय पोतदार यांना प्रदान केला जाणार आहे. रत्नागिरी कारागृहात ते तुरूंगाधिकारी असून कैद्यांसाठी खुल्या कारागृहासहित अनेक उपक्रम राबवत कैद्यांना स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली टेलिमेडिसिनचा प्रयोग करणारे रत्नागिरी हे महाराष्ट्रातील दुसरे कारागृह आहे. जवळपास २० कोटींच्या निधीतून कारागृहाची दुरुस्ती करून सोफासेट, वॉकीटॉकी, टी.व्ही. आरओची सोय केली. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर कोण होते, हे कैद्यांना समजावे म्हणून कारागृहातील सावरकर स्मृतीकक्षामध्ये सुधारणा केल्या. सावरकरांच्या नावे ४०० पुस्तकांचे वाचनालय सुरू केले. सावरकर स्मारक पुनरुज्जीवित करून त्याला विशेष पर्यटन दर्जा मिळवून देण्यासाठी ते निःस्वार्थ प्रयत्न करत आहेत. सावरकरांवर थ्रीडी प्रोजेक्ट बनवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी चिपळूणच्या महापुरात बचावकार्यात भाग घेतला आणि पूरग्रस्तांना २ ते ३ लाखांची मदत केली. कोरोनाच्या काळात सलग तीन महिने रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत अन्नदान, शिधावाटप केले.