जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार विजेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार विजेवर
जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार विजेवर

जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार विजेवर

sakal_logo
By

(पान २ साठी)

जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार विजेवर!

कोकण रेल्वे मार्ग ; इंदौर-कोचुवेली, भावनगर एक्स्प्रेसही विजेवर

खेड, ता. ९ ः कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या आणि वर्षभरातील सर्वच दिवस प्रवाशांनी हाऊसफुल्ल धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेस, इंदोर- कोचुवेली तसेच कोचुवेली-भावनगर या तीन गाड्यादेखील आता डिझेलऐवजी विद्युत इंजिनसह धावणार आहेत. यापैकी मुंबई सीएसटी ते मडगाव दरम्यानची जनशताब्दी एक्स्प्रेस आज पासून मुंबईतून मडगावसाठी विद्युत इंजिनसह धावणार आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने आधी मालगाड्या तर त्या पाठोपाठ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्यादेखील विद्युत इंजिनसह चालवल्या जात आहेत. यानुसार आता मुंबई-सीएसएटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आज पासून, इंदौर- कोचुवेली साप्ताहिक एक्स्प्रेस ८ नोव्हेंबरच्या फेरीपासून विजेवर धावू लागली आहे. ही गाडी कोचुवेली ते इंदूर मार्गावर धावताना ११ नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे. याचबरोबर भावनगर ते कोचुवेली ही कोकण रेल्वेमार्गे धावणारी आणखी एक साप्ताहिक एक्स्प्रेस १५ नोव्हेंबरच्या फेरीपासून विद्युत इंजिनसह धावणार आहे. ही गाडी कोचुवेली ते भावनगर मार्गावर धावताना १७ नोव्हेंबरच्या फेरीपासून विद्युत इंजिनसह धावणार आहे.