रत्नागिरी-नदीकिनारी विनापरवाना हातभट्टी दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-नदीकिनारी विनापरवाना हातभट्टी दारू जप्त
रत्नागिरी-नदीकिनारी विनापरवाना हातभट्टी दारू जप्त

रत्नागिरी-नदीकिनारी विनापरवाना हातभट्टी दारू जप्त

sakal_logo
By

गौतमी नदीकिनारी हातभट्टी दारू जप्त
पावसः गौतमी नदीकिनारी विनापरवाना हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्याविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सचिन पांडुरंग बंडबे (वय ४३, रा. कोळंबे, बंडबे गोरिवलेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास गौतमी नदीकिनारी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे ६०५ रुपयांची दहा लिटर दारू सापडली. या प्रकरणी पोलिस नाईक प्रशांत पाटील यांनी पूर्णगड पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पूर्णगड पोलिस अंमलदार करत आहेत.