बॅडमिंटन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅडमिंटन स्पर्धा
बॅडमिंटन स्पर्धा

बॅडमिंटन स्पर्धा

sakal_logo
By

(पान ५ साठी)

१९ नोव्हेंबर पासून जिल्हास्तरीय
ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धा

रत्नागिरी, ता. ९ ः रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन येत्या १९ व २० नोव्हेंबरला केले आहे. दोन-तीन वर्षांत स्पर्धाच न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना संधीच मिळाली नाही. या विद्यार्थ्यांचा सराव सुरू आहे व आता त्यांना स्पर्धेतून संधी देण्याकरिता या जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशन ही रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनशी संलग्न आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे स्पर्धांचे आयोजन करता आले नव्हते; परंतु आता ज्युनिअर मुला-मुलींसाठी जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. ११, १३, १५, १७ आणि १९ या वयोगटातील मुला-मुलींसाठी एकेरीच्या स्पर्धा १९ व २० नोव्हेंबरला मारूती मंदिर येथील जिल्हा क्रीडासंकूल येथे आयोजित केल्या आहेत. इच्छुक स्पर्धकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी १६ नोव्हेंबरपूर्वी करावयाची आहे. अधिक माहितीसाठी प्रसन्न आंबुलकर किंवा सरोज सावंत यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर यांनी केले आहे.