‘हे चांदणे फुलांनी’ ने जिंकली सावंतवाडीवासीयांची मने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हे चांदणे फुलांनी’ ने जिंकली सावंतवाडीवासीयांची मने
‘हे चांदणे फुलांनी’ ने जिंकली सावंतवाडीवासीयांची मने

‘हे चांदणे फुलांनी’ ने जिंकली सावंतवाडीवासीयांची मने

sakal_logo
By

61363
सावंतवाडी ः मैफलीत सहभागी कलाकार.

‘हे चांदणे फुलांनी’ ने जिंकली सावंतवाडीवासीयांची मने

उत्स्फूर्त प्रतिसाद; सदाबहार गीते, नृत्याविष्कारांनी कार्यक्रमात रंगत

सावंतवाडी, ता. ९ ः जिल्ह्यात कला व सांस्कृतिक चळवळीमध्ये नेहमीच अग्रेसर असलेले श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ आयोजित, दीपक केसरकर मित्रमंडळ व सावंतवाडी पालिका प्रस्तुत, नीलेश मेस्त्री निर्मित व संकल्पनेतून खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित ''हे चांदणे फुलांनी'' या जुन्या-नव्या हिंदी, मराठी गीते व नृत्याविष्कार मैफिलीने रसिकांची मने जिंकली. सलग पाचव्या वर्षी या मैफिलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानात सोमवारी (ता. ७) ही मैफल रंगली. यात सद्गुरु संगीत विद्यालयाच्या वर्षा देवण, अॅड. सिद्धी परब, समृद्धी सावंत, मधुरा खानोलकर, केतकी सावंत, गौरांगी सावंत, अनामिका मेस्त्री, पूजा दळवी, नितीन धामापूरकर, भास्कर मेस्त्री, सर्वेश राऊळ, मानसी वझे, अंकुश आजगावकर, स्मिता गावडे, प्रगती मिशाळ, चिन्मयी मेस्त्री, श्रीया म्हालटकर, तन्वी दळवी, वैष्णवी गावडे, लतिका नाईक, वैष्णवी वाडकर आदी कलाकारांच्या सरस गायनाने सावंतवाडीकर मंत्रमुग्ध झाले. वैष्णवी गावडे, कलानिकेतन सांस्कृतिक कला मंडळ सावंतवाडी व बांदाच्या जिया कळंगुटकर, वैदेही बांदेकर, निधी सावंत, दुर्वा गवस, वेदिका गावडे, मनस्वी हरमलकर, सिद्धाली राऊळ, प्राजक्ता कळंगुटकर, शेफाली केसरकर यांच्या नृत्यामुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली. कार्यक्रमाला साथ संगत नीलेश मेस्त्री, मंगेश मेस्त्री (हार्मोनियम), किशोर सावंत, नीरज भोसले (तबला), शुभम सुतार (ढोलक/ढोलकी), अश्विन जाधव (ऑक्टोपॅड), बाळकृष्ण मेस्त (सिंथेसायझर) यांची लाभली. ध्वनी व्यवस्था सुभाष शिरोडकर यांनी सांभाळली. संजय कात्रे, उमा तिळवे यांचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, नादब्रह्म सावंतवाडीचे अध्यक्ष प्रदीप शेवडे, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, भारती मोरे, पुंडलिक दळवी, सुधीर आडिवरेकर, अभिमन्यू लोंढे, भाऊ साळगावकर, भाई देऊलकर, दादा मडकईकर, वैभव केंकरे, विनोद गावकर, संदीप गवस, दिनकर परब, हेमंत खानोलकर, सोमा सावंत, तानाजी सावंत, बाळ पुराणिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुधीर आडिवरेकर, महादेव गावडे, राघव नाईक, अर्चना नाईक, गजानन वेंगुर्लेकर, राजन हावळ, गोविंद मळगावकर, समर्थ केळुसकर, अखिलेश कानसे यांचे विशेष सहकार्य लाभले.
......................
‘झाला साक्षात्कार’ने कार्यक्रमाची सांगता
याप्रसंगी ऋतू हिरवा, कशी करू स्वागता, मन तळ्यात मळ्यात, केसरिया बालमा, छत आकाशाचे, चंदाराणी, चार होत्या पक्षिणी त्या, मलमली तारुण्य माझे, पाहिले न मी तुला, नभ उतरू आलं, झुंजुर मुंजूर, हृदयी वसंत फुलताना, तोच चंद्रमा नभात, प्यार हुआ चुपकेसे, एवढे तरी करून जा, आला आला वारा, कुहू कुहू बोले, धुंदीत राहू, स्वर्ग हा नवा, लल्लाटी भंडार आदी एकापेक्षा एक सरस गीते सादर करण्यात आली. ‘झाला साक्षात्कार...’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.