रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रसूती विभागात डॉक्टरांची वानवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी  जिल्हा रुग्णालयात प्रसूती विभागात डॉक्टरांची वानवा
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रसूती विभागात डॉक्टरांची वानवा

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रसूती विभागात डॉक्टरांची वानवा

sakal_logo
By

जिल्हा रुग्णालयात प्रसूती
विभागात डॉक्टरांची वानवा
रत्नागिरी, ता. ९ ः जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ दहा ते बारा दिवस झाले रजेवर गेल्याने प्रसूती विभागात एकही डॉक्टर नाही. खासगी डॉक्टर येतात; मात्र ते २४ तास बांधिल नाहीत. जर एखाद्या गरोदर मातेची तब्येत अधिक बिघडली की, कोल्हापूर सीपीआरला हलवण्याची वेळ रुग्णालयावर आली आहे. खासगी डॉक्टरांनी सहकार्य करावे, असे आवाहन करूनही जिल्हा रुग्णालयाला फारसा प्रतिसाद मिळत नाही.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. महिन्याला तब्बल २५० हून अधिक प्रसुत्या होतात. अगदी रत्नागिरी शहर ते मंडणगड तालुक्याच्या टोकापर्यंत सर्व गरोदर मातांना या ठिकाणी चांगली सेवा मिळते म्हणून दाखल होत असतात. मुळात गेली अनेक वर्षे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. अशा परिस्थितीतही सिव्हिल हॉस्पिटल रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. डेरवण वालावलकर हॉस्पिटलने सध्या मदतीचा हात दिला असून काही पीजीचे डॉक्टर या ठिकाणी येऊन सेवा देतात; मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याने सध्या प्रसूती विभागात कामाचा भार वाढला आहे. दिवसा काही खासगी डॉक्टर येऊन प्रसूती करून जातात; मात्र अद्यापही बरेच खासगी डॉक्टर सिव्हिलला अपेक्षित सहकार्य करत नसल्याची बाब समोर आली आहे.