फणसोप उपसरपंचपदी ठाकरे गटाचे फणसोपकर विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फणसोप उपसरपंचपदी ठाकरे गटाचे फणसोपकर विजयी
फणसोप उपसरपंचपदी ठाकरे गटाचे फणसोपकर विजयी

फणसोप उपसरपंचपदी ठाकरे गटाचे फणसोपकर विजयी

sakal_logo
By

rat९p२३.jpg-
६१३८६
रत्नागिरीः फणसोप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत ठाकरे सेनेचे आलमहरा फणसोपकर निवडून आल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना सरपंच राधिका साळवी व उपविभागप्रमुख राकेश साळवी आदी.

फणसोप उपसरपंचपदी ठाकरे
गटाचे फणसोपकर विजयी
रत्नागिरी, ता. ९ ः फणसोप ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा ठाकरे सेनेचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. आज उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारावर चार मतांनी विजय मिळवत ठाकरे सेनेचे उमेदवार आलमहरा उमेर फणसोपकर या उपसरपंच म्हणून निवडून आल्या. त्यांच्या निवडीनंतर ठाकरे सेनेने जोरदार जल्लोष केला.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सेना विरुद्ध सेना, अशी जोरदार लढत झाली. जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरीमध्ये शिंदे गटाच्या सेनेला चांगले यश आले, तर उत्तर रत्नागिरीमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील चर्चेत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये फणसोप ग्रामपंचायतींचा समावेश होता. या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचे वर्चस्व होते; परंतु आमदार उदय सामंत सेनेत आल्यानंतर त्यांनी या भागात आपले प्रस्थ वाढवले. त्यामुळे गेल्या निवडणुकीत राजन साळवींना येथे मोठा धक्का बसला होता आणि सामंत समर्थक निवडून आले होते; मात्र या भागात साळवी समर्थक राकेश साळवी यांचे काम चांगले आहे. मोठा जनसंपर्क असल्याने आणि स्थानिकांना नेहमी सहकार्य करण्याच्या भूमिकेमुळे नुकत्याच झालेल्या थेट सरपचंपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाला झटका देत राधिका साळवी या पुन्हा सरपंच म्हणून निवडून आल्या.
फणसोप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी आज निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये शिंदे गटानेही उडी मारली. शिंदे गटाच्या अलसमद मोइद्दीन भाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती तर ठाकरे गटाकडून आलमहरा उमेर फणसोपकर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एकूण ११ जागांपैकी फक्त एक उमेदवार शिंदे गटाचा निवडून आला होता. तरी ते या निवडणुकीत उतरले होते. यामध्ये शिंदे गटाच्या भाटकर यांना ४ मते मिळाली तर ठाकरे गटाच्या फणसोपकर यांना ८ मते मिळून त्या विजयी ठरल्या. सरपंचपदानंतर उपसरपंच पदातही ठाकरे गटाने येथे वर्चस्व ठेवले.