पान एक-ग्रामपंचायतींसाठी 28 डिसेंबरला मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-ग्रामपंचायतींसाठी 28 डिसेंबरला मतदान
पान एक-ग्रामपंचायतींसाठी 28 डिसेंबरला मतदान

पान एक-ग्रामपंचायतींसाठी 28 डिसेंबरला मतदान

sakal_logo
By

पान एक

जिल्ह्यात ३२५ गावांत उडणार धुरळा
ग्रामपंचायत निवडणूक; २८ पासून अर्ज भरणे; २८ डिसेंबरला मतदान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः ग्रामीण विकासाची महत्त्वाची पायरी असलेल्या ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जिल्ह्यातील ४३१ पैकी तब्बल ३२५ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यपदांसाठी २८ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, आठ पंचायत समिती व तीन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.
जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक मुदती ऑक्टोबर महिन्यात संपल्या असून नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात संपणार आहेत. अशा ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या ४३१ पैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने या निवडणुकीचा पगडा पूर्ण जिल्ह्यात राहणार आहे. डिसेंबर २०२१ मध्ये तीन नगरपरिषदा, तर मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या मुदती संपल्या आहेत. तेथील कारभार प्रशासक पाहत आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पहिल्या निवडणुका होतील, असे आखाडे राजकीय व्यक्ती बांधत असताना निवडणूक आयोगाने पंचवार्षिक मुदती संपणार असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

चौकट
जिल्ह्यातील एकूण ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यात देवगड तालुका ३८, दोडामार्ग २८, कणकवली ५८, कुडाळ ५४, मालवण ५५, सावंतवाडी ५२, वैभववाडी १७, वेंगुर्ले २३ अशा प्रकारे तालुकानिहाय समावेश आहे.

निवडणूक कार्यक्रम
१८ नोव्हेंबर ः तहसीलदार जाहीर करणार निवडणूक अधिसूचना
२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर ः उमेदवारी अर्ज दाखल करणे
५ डिसेंबर ः सकाळी १० वाजता अर्ज छाननी
७ डिसेंबर ः दुपारी ३ पर्यंत माघार, नंतर चिन्ह वाटप
१८ डिसेंबर ः सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान
२० डिसेंबर ः मतमोजणी
२३ डिसेंबर ः जिल्हाधिकारी निकाल अधिसूचना करणार जाहीर