जयगड परिसरात कोळशामुळे प्रदूषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयगड परिसरात कोळशामुळे प्रदूषण
जयगड परिसरात कोळशामुळे प्रदूषण

जयगड परिसरात कोळशामुळे प्रदूषण

sakal_logo
By

(पान 3 साठी)

फोटो ओळी
-rat9p24.jpg-

61394

रत्नागिरी ः प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आंग्रे पोर्ट परिसरात कोळशापासून होणाऱ्या प्रदुषणाबाबत निवेदन देताना नंदू केदारी.

जयगड परिसरात कोळशामुळे प्रदूषण

रत्नागिरी, ता. 9 ः तालुक्यातील जयगड परिसरात आलेल्या आंग्रे पोर्ट परिसरात उतरवण्यात येणाऱ्या कोळशामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी प्रदूषित झाल्या आहेत. जनतेला वेठिस धरणाऱ्या या कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय नागरी व पर्यावरण राष्ट्रीय संस्थेचे नंदू केदारी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जयगड येथील चाफेरी परिसरानजीक आंग्रे पोर्ट आहे. या बंदरावर कोळसा उतरवण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी कोळसा उतरवण्यासाठी आवश्यक परवानगी कंपनीने घेतली आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय कोळसा साठा करून ठेवण्यासाठी बंदरावर वेगळी व्यवस्था नाही. वाऱ्यासोबत कोळसा पावडर परिसरातील घरांमध्ये, विहिरींमध्ये आणि खाडी व समुद्रात जाते. त्यामुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका आहे, अशी तक्रार केदारी यांनी केली आहे. याशिवाय हा कोळसा पावडर आंबा कलमांवर पडत असून झाडे मृत होण्याची भीती आहे. हवेतून कोळसा पावडर श्वसनाद्वारे शरीरात जाऊन श्वसनाचे विकार होण्याचा धोका निर्माण झाला आहे तरी संभावित धोका लक्षात घेता आपण उचित कारवाई करून येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे केदारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.