शौचालय पाडल्याप्रकरणी बांद्यात एकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शौचालय पाडल्याप्रकरणी 
बांद्यात एकावर गुन्हा दाखल
शौचालय पाडल्याप्रकरणी बांद्यात एकावर गुन्हा दाखल

शौचालय पाडल्याप्रकरणी बांद्यात एकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

शौचालय पाडल्याप्रकरणी
बांद्यात एकावर गुन्हा दाखल
बांदा, ता. ९ ः बांदा ग्रामपंचायतीने १९९४ मध्ये बांधलेले आंबेडकरनगर येथील शौचालय ग्रामपंचायतीला कोणतीही कल्पना न देता जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्याप्रकरणी भरत सीताराम बांदेकर (रा. आंबेडकरनगर, बांदा) यांच्यावर सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याप्रकरणी बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ग्रामविकास अधिकारी लीला मोर्ये यांनी बांदा पोलिसात फिर्याद दिली.
याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बांदा ग्रामपंचायतीने १९९४ मध्ये आंबेडकरनगर येथे शौचालय बांधले. हे शौचालय ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वपरवानगी न देता बांदा-आंबेडकरनगर येथील भरत बांदेकर काल (ता. ८) सकाळी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. अशी फिर्याद बांदा ग्रामविकास अधिकारी मोर्ये यांनी दिली. त्यानुसार बांदा पोलिसांत सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल संजय हुंबे करीत आहेत.