सावंतवाडीतून दुचाकी चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतून दुचाकी चोरीस
सावंतवाडीतून दुचाकी चोरीस

सावंतवाडीतून दुचाकी चोरीस

sakal_logo
By

सावंतवाडीतून दुचाकी चोरीस
सावंतवाडी, ता. ९ ः येथील जुना शिरोडा नाका परिसरात स्वरांजली बिल्डिंगमध्ये उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबतची खबर भास्कर देसाई यांनी सावंतवाडी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दखल केला.
अधिक माहिती अशी की, देसाई यांनी काल सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी (क्र. एमएच ०७ व्ही ७३४३) उभी केली होती; मात्र आज सकाळी गाडी दिसली नाही. सर्वत्र शोधाशोध करूनही गाडी न मिळाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून ही गाडी कोणाला आढळून आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन सावंतवाडी पोलिसांनी केले आहे.