नाटळ येथे एकाचा आकस्मिक मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटळ येथे एकाचा
आकस्मिक मृत्यू
नाटळ येथे एकाचा आकस्मिक मृत्यू

नाटळ येथे एकाचा आकस्मिक मृत्यू

sakal_logo
By

नाटळ येथे एकाचा
आकस्मिक मृत्यू
कणकवली,ता. ९ ः मोबाईल पहात असताना बेशुद्ध झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नाटळ येथे घडली. संदेश सुभाषचंद्र सावंत (वय ४२ रा. मुंलुंड, मुंबई), असे त्यांचे नाव आहे. याबाबत येथील पोलिसांत मिलिंद तुकाराम दळवी (वय ५८ रा. मुलुंड मुंबई मुळ रा. नाटळ) यांनी खबर दिली. हा प्रकार ८ नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास घडला. संदेश सावंत हे मुंबई येथून गावी नाटळ येथे आले होते. ते आपल्या घरी मोबाईल पाहत असताना अचानक बेशुद्ध झाले. दळवी यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक एस. एस. पाटील हे अधिक तपास करीत आहेत.