रस्ताकामास तेंडोलीत प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ताकामास तेंडोलीत प्रारंभ
रस्ताकामास तेंडोलीत प्रारंभ

रस्ताकामास तेंडोलीत प्रारंभ

sakal_logo
By

रस्ताकामास तेंडोलीत प्रारंभ
कुडाळ ः तेंडोली-कुमणोसवाडी येथील पुरुषोत्तम मंदिर ते धनगरवाडी हा रस्ता मंजूर होऊन ग्रामपंचायत शासकीय दप्तरी नोंद झाला आहे. या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ तेंडोली तंटामुक्ती समिती अध्यक्ष संदेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच मंगेश प्रभू, संदीप प्रभू, श्याम प्रभू, भाऊ पारकर, संतोष खुळे, कुमणोसवाडी, धनगरवाडी ग्रामस्थ आदी उपस्थित होते. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या या रस्त्याची प्रतीक्षा अखेर पूर्ण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रस्ता नसल्याने तेथील ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत होता. कुमणोसवाडी ते धनगरवाडी हा रस्ता ३ किलोमीटर आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. रस्ता मंजूर होण्यासाठी वेळोवेळी अ‍ॅड. राजीव ठाकुर यांचे योगदान लाभले. रस्ता लवकरात लवकर खडीकरण करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.