मालवणात १०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात १०० रुपयांच्या
बनावट नोटांचा सुळसुळाट
मालवणात १०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट

मालवणात १०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट

sakal_logo
By

61421
मालवण ः शहरातील काही व्यापाऱ्यांना आढळलेल्या शंभर रुपयांच्या बनावट नोटा.

मालवणात १०० रुपयांच्या
बनावट नोटांचा सुळसुळाट
मालवण, ता. ९ : शहरात सध्या १०० रुपयांच्या जुन्या व नव्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. याचा फटका शहरातील काही व्यापाऱ्यांना बसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
शहरातील वायरी येथील रास्त धान्य दुकानदार सुहास हडकर यांना १०० रुपयांच्या जुन्या व नव्या तीन बनावट नोटा आढळून आल्या. बँकेत पैसे भरण्यास गेल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला असून अशा बनावट नोटा बाजारात चलनात आल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी १०० च्या नोटा तपासून घेणे गरजेचे बनले आहे. या बनावट नोटांमध्ये तार तसेच अन्य काही बाबी नसल्याचे तसेच काही नोटा रंगीत झेरॉक्स काढलेल्या स्वरूपात असल्याचे दिसून आले आहे.