कणकवली : कायेदा मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : कायेदा मार्गदर्शन
कणकवली : कायेदा मार्गदर्शन

कणकवली : कायेदा मार्गदर्शन

sakal_logo
By

kan102.jpg
L61477
कनेडीः येथील कायदेविषयक शिबिरात बोलताना न्या. टी. एच. शेख. सोबत एच. डी. सोनटक्के, अॅड. मिलिंद सावंत, अॅड. बी. आर. पाटील, सुमंत दळवी आदी.

लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पुढे या
न्यायाधीश टी. एच. शेखः कनेडी हायस्कूलमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन
कणकवली, ता. १०ः बालकांच्या लैंगिक अत्याचाराला रोखण्यासाठी आपल्याकडे सक्षम असा कायदा आहे. मात्र, कोणत्याही बालकाबाबत किंवा मुलीबाबत एखादी घटना घडत असेल तर ती तात्काळ आपले शिक्षक किंवा आई-वडिलांना सांगितले पाहिजे. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर योग्य तो तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर अशा गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. त्यामुळे बाल गुन्हेगारी कमी होण्याची प्रमाण रोखता येईल, असे प्रतिपादन कणकवली न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश टी. एच. शेख यांनी कनेडी हायस्कूल येथे बोलताना केले.
तालुका विधी सेवा समिती आणि माध्यमिक विद्यामंदिर कनेडी यांच्यावतीने कनेडी हायस्कूलच्या ज्ञानदीप सभागृहामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. यावेळी श्री. शेख बोलत होते.
यावेळी सहदिवाणी न्यायाधीश एच. डी. सोनटक्के, अॅड. मिलिंद सावंत, अॅड. बी. आर. पाटील, शालेय समितीचे खजिनदार गणपत सावंत, नाना सावंत, तुषार सावंत, मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदी उपस्थित होते. दिवाणी न्यायाधीश श्री. शेख यांनी पोस्को कायदा अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कायद्याची माहिती आणि कर्तव्याचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरातून प्रयत्न सुरू झाले आहेत. आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे औचित्य साधून कायदेविषयक ज्ञान तळागाळात पोचवण्याचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे बालकांवर होणारे लैंगिक अत्याचाराचे, बाल शोषण, स्त्रीभ्रूणहत्या वेळीच उघडकीस यायला हवी. यासाठी पोलिसांकडून योग्य तपासही व्हायला हवा. अशा गुन्हेगारांना रोखण्यासाठी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर शिक्षा दिली जाते. कोणत्याही बालकाला अंगविक्षेप करणे, त्याला हात लावणे, आमिष दाखवून शोषण करणे ही गुन्हेगारी प्रवृत्ती रोखली पाहिजे. यासाठी मुलांनीही अशी घटना घडली तर आई-वडिलांना याची माहिती द्यावी. शिक्षक हे आपले मित्र असतात, त्यांच्याशी संवाद साधायला हवा. समाजामधील ही गुन्हेगारी संपायची असल्यास प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे.
मुलांचे अधिकार आणि रॅगिंग कायदा याविषयी अॅड. सावंत यांनी मार्गदर्शन केले. कायदेविषयक सेवा, कायद्याचे संरक्षण, वाहतुकीचे नियम याविषयी अॅड. पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर यांनी केले. एम. एम. साटम यांनी आभार मानले.