कणकवली : सक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : सक्षिप्त
कणकवली : सक्षिप्त

कणकवली : सक्षिप्त

sakal_logo
By

हरकुळ येथील एकावर गुन्हा
कणकवली ः महिलेविषयी अश्लील शब्द वापरून तिचा अपमान केल्याप्रकरणी हरकुळ खुर्द येथील एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भिकाजी श्रीधर रासम असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार २९ सप्टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास घडला होता. त्या महिलेने येथील पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर संशयीतावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


रेल्वेत चोरी प्रकरणी एकाला जामीन
कणकवली ः कोचीवली एक्सप्रेसमधून रत्नागिरी ते केरळ असा प्रवास करत असताना प्रवाशाला पोलीस असलेल्याचे भासवून त्याच्याकडील ४२ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याप्रकरणी एकाला जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये विनोद अधिकाराव पोळ (मूळ रा. सांगली) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी २५ हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या वतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. हा प्रकार २५ मे रोजी घडला होता.

कनेडी परिसरात थंडीची चाहुल
कनेडी ः येथील सह्याद्रीपट्ट्या आता थंडीची चाहुल लागली आहे. पावासाच्या विश्रांतीनंतर वातावरणात गारावा आहे. रात्री गुलाबी थंडीचा अनुभव मिळात आहे. थंडीमुळे यंदा आंबा, काजूला मोहर येण्याची प्रक्रीया सुरू होणार आहे. वातावरानाती तापमान कमी झाले आहे. रात्रपासून पहाटेपर्यत थंडी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिला मिळाला आहे.