डॉ. श्रीपाद पाटलांचा सिंधुदुर्गनगरीत सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. श्रीपाद पाटलांचा सिंधुदुर्गनगरीत सन्मान
डॉ. श्रीपाद पाटलांचा सिंधुदुर्गनगरीत सन्मान

डॉ. श्रीपाद पाटलांचा सिंधुदुर्गनगरीत सन्मान

sakal_logo
By

swt१०६.jpg
६१४८६
सिंधुदुर्गनगरीः भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे डॉ. श्रीपाद पाटील यांचा सत्कार करताना सहसंयोजक डॉ. अमेय देसाई.

डॉ. श्रीपाद पाटलांचा सिंधुदुर्गनगरीत सन्मान
भाजपचा पुढाकारः नेत्र चिकित्सा शिबिरातील योगदानाची दखल
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १०ः भाजप वैद्यकीय आघाडीच्या पाठपुराव्यामुळे व सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे व तुळस पंचक्रोशीतील ६० वृद्ध रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे करण्यात आली. याबाबत भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. अमेय देसाई यांच्या हस्ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सप्टेंबरमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे ग्रामपंचायत व तुळस आरोग्य केंद्रात भाजपच्या सहकार्याने मोतिबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या दोन्ही शिबिरांत सुमारे २६० ग्रामस्थांनी सहभाग घेऊन डोळ्यांची तपासणी करून घेतली होती. त्यातील अत्यावश्यक असलेल्या रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात ऑक्टोबरमध्ये करण्यात आली. यामध्ये वेंगुर्लेतील ६० जणांचा समावेश होता. या उपक्रमाचा गोरगरीब जनतेला फायदा झाला. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांचा भाजपच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय आघाडीचे डॉ. अमेय देसाई, भाजप जिल्हा चिटणीस व माजी सभापती नीलेश सामंत, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष व कुशेवाडा उपसरपंच नीलेश सामंत, तुळस शक्तिकेंद्र प्रमुख व तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस नारायण कुंभार आदी उपस्थित होते.