संस्था, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्था, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत
संस्था, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत

संस्था, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत

sakal_logo
By

swt105.jpg
61485
मालवणः तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभप्रसंगी उपस्थित मान्यवर.

संस्था, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत
बाळू अंधारी ः रामेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १०ः महाविकास आघाडी संस्था आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहील, अशी ग्वाही तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलच्यावतीने बाळू अंधारी यांनी दिली. आपल्या उमेदवारांचा सर्व जागांवर विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभ काल (ता. ९) करण्यात आला. यावेळी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका करत महाविकास आघाडी संस्था आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहील, असा शब्द देण्यात आला. या निवडणुकीत माजी संचालक मनोज लुडबे, मनोज राऊत, सुभाष तळवडेकर हे पुन्हा महाविकास आघाडीतून आपले नशीब आजमावत आहेत. जिल्हा बँक संचालक तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी हे या पॅनेलचे नेतृत्व करत आहेत. माजी नगरसेविका नीना मुंबरकर याही सहकार क्षेत्रात पदार्पण करण्यात सज्ज झाल्या आहेत. माजी सरपंच चंदन पांगे, साक्षी लुडबे याही निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेचे संस्थापक बाळू अंधारी, श्री. अटक हे ही निवडणूक लढवीत आहेत. सहकारात अनेक वर्षे काम केलेले आणि अनेक संस्था उभ्या केलेल्या व्यक्तींचा महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये सहभाग असल्याने या पॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
खरेदी-विक्री संघात काम करणारे कामगार आणि संस्थेवर विश्वास ठेवून असलेल्या सभासदांच्या हितासाठी आमचे पॅनेल कार्यरत राहणार आहे. आजपर्यंत संस्थेतील अनेक वादातील गोष्टींवर आमच्या माजी संचालकांनी आवाज उठविला होता. मात्र, सत्ताधारी नसल्याने या संचालकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता सभासदांनी विश्वास दाखवला तर परिवर्तन निश्चित आहे. सध्या प्रचारात फिरताना सर्वत्र महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरेदी विक्री संघावर महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास अंधारी यांनी व्यक्त केला आहे.