स्त्री सुसंस्कृत समाजाचा आधारवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्त्री सुसंस्कृत समाजाचा आधारवड
स्त्री सुसंस्कृत समाजाचा आधारवड

स्त्री सुसंस्कृत समाजाचा आधारवड

sakal_logo
By

swt1010.jpg
61521
कुडाळः कायदेविषयक कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सहदिवाणी न्यायाधीश पवन ढोरे. सोबत अॅड. उल्का पावसकर, अॅड. तृप्ती वालावलकर-अडुळकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

स्त्री ही सुसंस्कृत समाजाचा आधारवड
न्यायमूर्ती पवन ढोरे ः कुडाळमध्ये महिला सबलीकरण विषयावर कार्य़शाळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ. ता. १०ः स्त्री ही सुसंस्कृत समाजाचा आधारवड आहे. तिचा सन्मान करून तिला योग्य न्याय द्या. ज्या देशात महिलांचा सन्मान होतो, त्या देशाची प्रगती कोणीही रोखू होऊ शकत नाही, असे प्रतिपादन येथील दिवाणी न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश पवन ढोरे यांनी केले. ते बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग अंतर्गत कायदेविषयक जनजागृती व महिला सबलीकरण या विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये बोलत होते.
न्यायमूर्ती ढोरे म्हणाले, "स्त्रीच नव्हे, तर कोणत्याही व्यक्तीला न्यायालयामध्ये जाण्याची वेळच न येऊ देणे हे सुसंस्कृत समाजाचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. तिला विनाविलंब न्याय मिळाला पाहिजे. यातच तिच्या अस्मितेचा गौरव आहे. संस्कृतीची शान आहे. हा विचार समाजातील घराघरांत पोचला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने समाज पर्यायाने देश घडेल. नवीन पिढी घडेल. स्त्रीचा सन्मान आणि संरक्षणासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे. त्याचा लाभ स्त्रियांना मिळण्यासाठी कायद्याचे रक्षक, न्यायदान करणाऱ्या व्यक्तींनी कटिबद्ध राहावे. पीडित स्त्रीला सन्मानाची वागणूक देण्याची मानसिकता समाजात निर्माण झाली पाहिजे."
यावेळी व्यासपीठावर महिला व रात्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य अरुण मर्गज, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, सीबीएसईच्या प्राचार्य शुभांगी लोकरे, दिवाणी न्यायालयाच्या कार्यालयीन व्यवस्थापक आर्या अडुळकर, अॅड. उल्का पावसकर, अॅड. तृप्ती वालावलकर-प्रभू देसाई, कविता खोचरे-बोभाटे आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती ढोरे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अॅड. पावसकर यांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी कायद्यातील विविध कलमे, तरतुदींची माहिती दिली. अॅड. वालावलकर-प्रभूदेसाई यांनी आजच्या समाजात स्त्रिया तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक स्थानाचा परिचय करून दिला. प्रास्ताविक अरुण मर्गज यांनी, तर सूत्रसंचालन आर्या अडुळकर यांनी केले.