काळोख- उजेड यांच्यातील सीमारेषेचा क्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळोख- उजेड यांच्यातील सीमारेषेचा क्षण
काळोख- उजेड यांच्यातील सीमारेषेचा क्षण

काळोख- उजेड यांच्यातील सीमारेषेचा क्षण

sakal_logo
By

( टुडे पान ३ साठी, प्रासंगिक लेख)
(टीप- कालचा लेख रद्द करून हा लेख घ्यावा.)

फोटो ओळी
-rat१०p२.jpg -
६१४५२
धोतराच्या एका पानाच्या वाती करून त्रिपूर लावतात.

-rat१०p३.jpg -
६१४५३
श्रीभवानी-गांगेश्वर मंदिराच्या आवाराती उजळलेली दीपमाळ.
-rat१०p४.jpg -
६१४५४
श्रीभवानी-गांगेश्वराचा त्रिपुरारीला उत्सवी साज.


इंट्रो
त्रिपुरारीच्या उत्सवात यावर्षी निद्रादेवीशी लढत लढत लळितापर्यंत थांबले. डोळे मिटायला लागले तेव्हा डोळ्यावर पाणी मारण्यासाठी म्हणून बाहेर आले आणि देवळापासून दहा-वीस पावलांवर बाहेरच थांबले. हेचि दान देगा देवा सुरू झालं आणि मी देवळात जाण्यासाठी निघाले अन् त्याचवेळी तो क्षण मला दिसला. अक्षरशः आधीचं पाऊल उचललं तेव्हा काळोख होता आणि दुसऱ्या पावलाच्यावेळी काळोख झरझर वितळत "रात सरली विझले तारे" अशी स्थिती झाली. केवळ अविस्मरणीय. साक्षात्काराचा क्षण असाच असेल असं वाटून गेलं.

- संध्या साठे-जोशी, चिपळूण


काळोख- उजेड यांच्यातील सीमारेषेचा क्षण

सूर्य उगवतांना आपण पाहतो त्या आधी तांबडं फुटलेलं पण पाहतो; पण काळोख आणि उजेड यांच्यातील सीमारेषा असणारा तो एक क्षण नुकताच दैवयोगानेच अनुभवायला मिळाला. कोकणी माणूस उत्सवप्रिय. मी कोकणी, त्यामुळे अर्थातच उत्सवप्रिय. नशिबाने माहेर व सासर दोन्ही ठिकाणी खूप वर्षांची परंपरा असलेले उत्सव आहेत. खानू (ता. रत्नागिरी ) इथल्या श्रीभवानी-गांगेश्वराचा उत्सव माझ्या सासरचा. प्रत्येकवेळी या उत्सवाच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला होतं. देऊळ शंकराचं म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव हे स्वाभाविकच; पण गंमत म्हणजे या उत्सवातील मुख्य इव्हेंट आहे तुळशीचं लग्न. ते मध्यरात्री लागतं. आवारात दोन दीपमाळा आहेत. त्यांच्या माथ्यावर कुंडीसारख्या खोलगट पणत्या आहेत. त्या पणत्यांमधे तेल आणि धोतराच्या एका पानाच्या दोन वाती करून त्रिपूर लावला जातो. तत्पूर्वी विधीवत पूजन करून अग्नी सिद्ध केला जातो आणि त्याच अग्नीने त्रिपूर पेटवला जातो. रात्री बाराला चेतवलेला त्रिपूर अगदी उजाडेपर्यंत जळत राहतो. त्याचवेळी तुळस आणि बाळकृष्ण यांची विधीवत पूजा चालू असते आणि आसमंतात अनेक पणत्या लावल्या जातात. ताशे-वाजंत्र्यांच्या गजरात मिरवणुकीने बाळकृष्णाचं मंडपात आगमन होतं. त्याच क्षणी सगळे कृत्रिम प्रकाशस्रोत मालवले जातात. फक्त पणत्यांचा उजेड आणि आकाशातून बरसणारं चांदणं. अगदी चढाओढीने मंगलाष्टकं म्हटली जातात. तदैव लग्नम् झालं, ताशेवाजंत्र्यांचा कडकडाट झाला की, मगच पुन्हा विजेचे दिवे लावले जातात..हा प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रसंग आहे.
उत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आरत्यांची सुरवात. ''आवडी गंगाजळे देवा न्हाणिले'', या विष्णूच्या आरतीने होते. बाकीच्या आरत्या त्यानंतर; पण त्यांचा क्रम, नंतरचे जयजयकार सगळ्यांचे क्रम ठरलेले असतात. उगाच कोणाला येतेय म्हणून, कोणाला आवडतेय म्हणून मध्येच कोणी वेगळी आरती सुरू करत नाही. उत्सवात छबिना भोवत्या अतिशय गांभीर्याने, ठरलेल्या ठिकाणी ठरलेले गजर म्हणत पार पडत होते. प्रत्येक भोवतीनंतर मुख्य प्रांगणात मोठा फेर धरून ब्रह्मानंदी लागली. टाळी, श्रीमन्नारायण नारायण, या या जेजुरी नगरात अशा गजरांवर स्त्रीपुरूष विविध पद्धतीने पदन्यास करीत नाचू लागतात.
आमचा उत्सव हा एका विशिष्ट समाजाचा किंवा विशिष्ट वाडीचा नाही तर सगळ्या गावाचा आहे. प्रत्येकजण त्यांच्यावर सोपवलेली कामं कसलाही गाजावाजा न करता जबाबदारीने पार पाडतात.
एक ग्रामस्थ श्री.अशोक शिंदे गेली २८ वर्ष भजनाची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांसह सातत्याने पेलत आहेत. आवाज सुरेल आहे अन् ६० ते ७० अभंग त्यांना मुखोद्गत आहेत. त्यांनी ''आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे'', हे काहीसं अवघड भजन इतक्या ताकदीने सादर केलं की, ते रेकॉर्ड करण्याचा मोह आवरू शकले नाही.
उद्योग व्यवसायानिमित्त गावाबाहेर गेलेले उत्सवाच्यावेळी गावाच्या ओढीने सगळे गावात येतात. गाव गजबजून जातो. त्यांचं कौतुक आहेच; पण जास्त कौतुक नव्याने कुटुंबात दाखल झालेल्या सुनांचं. उत्सवात अजून पारंपरिक पद्धतीने जमिनीवर बसून पंगती होतात. बुफेच्या उनाड खेळाला अद्याप प्रवेश नाही. पाऊणशे शंभर माणसांच्या तीन-तीन पंगती होतात. पुढच्या पिढीतील सुना न कंटाळता हसतमुखाने ही जबाबदारी लिलया पेलतात. दुसऱ्या घरी जाऊन त्या घराचे संस्कार, रितीरिवाज, रूढी-परंपरा आत्मसात करून तिथे एकरूप होण्याच्या स्त्रियांच्या या उपजत गुणधर्मामुळे परंपरा आणि संस्कृती पुढे नेली जाते, टिकून राहते हे अशावेळी अधोरेखित होतं.