चिपळूण ः कृषिमंत्र्यांच्या कृतीने महाविकास आघाडीला बूस्टर डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः कृषिमंत्र्यांच्या कृतीने महाविकास आघाडीला बूस्टर डोस
चिपळूण ः कृषिमंत्र्यांच्या कृतीने महाविकास आघाडीला बूस्टर डोस

चिपळूण ः कृषिमंत्र्यांच्या कृतीने महाविकास आघाडीला बूस्टर डोस

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१०p२३.jpg-KOP२२L६१५४० चिपळूण ः कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधातील निदर्शनात काँग्रेसचे शहरप्रमुख लियाकत शाह कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.
-rat१०p२४.jpg-KOP२२L६१५४१
राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सुटका होताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी असा आनंद व्यक्त केला.
---------
कृषिमंत्र्यांच्या कृतीने महाविकास आघाडीला बूस्टर डोस
चिपळूणमधील चित्र ; संघर्ष आणि आनंदाच्या क्षणात एकजूट
चिपळूण, ता. १० ः राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत खालच्या भाषेत टीका केल्याने मोठा वाद पेटला. चिपळूणमध्ये त्याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या विरोधात निदर्शने केली. सेनेचे खासदार संजय राऊत यांची जामिनावर सुटका होताच महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांनी आनंद व्यक्त केला. त्यामुळे भाजपविरोधी रस्त्यावरच्या लढाईत आणि आनंदाच्या क्षणात महाविकास आघाडी एकत्र असल्याचे चित्र चिपळुणात निर्माण झाले आहे. कृषिमंत्री सत्तार यांच्या चुकीच्या कृतीमुळे महाविकास आघाडीला बूस्टर डोस मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिपळूणमधील कार्यकर्त्यांनी राजकीय वणवा पेटवला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शहरात ठिकठिकाणी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात जोरदार निर्दशने करण्यात आली. विशेष म्हणजे शहरात सत्तार यांच्या विरोधात जेवढी निर्दशने झाली त्यात राष्ट्रवादीसह शिवसेनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर ते घोषणा देत होते. पोलिसांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित राहिले. सत्तार हे शिवसेनेतील फुटीर आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटातील कार्यकर्तेही आक्रमक झालेले दिसले.
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला. ते तुरुंगातून बाहेर येताच उद्धव ठाकरेंच्या गटातील शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केलाच. त्याशिवाय चिपळूणची राष्ट्रवादीही या आनंदात सहभागी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रत खताते, जिल्हा उपाध्यक्ष शौकत मुकादम, चंद्रकांत सावंत, गजानन महाडिक, मदन चांदे, नितीन मोरे, राजेंद्र कदम, अमित जाधव, संतोष शिंदे आदींनी एकत्र येऊन संपर्क कार्यालयासमोर फटाके वाजवले. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आनंदी दिसत होते. तेवढाच आनंद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

कोट
भाजप सरकार आणि पक्षाचे नेते सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांना त्रास देत आहे. महागाई वाढवून हा त्रास सामान्य लोकांनाही दिला जात आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा आणि भाजपच्या विरोधात आम्ही एकत्र आहोत आणि यापुढेही राहणार आहेत.
---शौकत मुकादम, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कोट
भाजपच्या विरोधात आमची एकजूट कायम आहे. भाजपविरोधी रस्त्याच्यावर लढाईत आणि आनंदाच्या क्षणात आम्ही एकत्र राहू. भाजपला हरवण्यासाठी भविष्यात निवडणुकाही एकत्र लढवू.
- लियाकत शाह, शहरप्रमुख, काँग्रेस