दाभोळ ः दापोलीतील 30 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः दापोलीतील 30 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल
दाभोळ ः दापोलीतील 30 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल

दाभोळ ः दापोलीतील 30 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल

sakal_logo
By

दापोलीतील ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल

सेनेच्या दोन गटात लढत ; सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी
दाभोळ, ता. १० ः दापोली तालुक्यातील १०६ पैकी ३० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी फार पूर्वीपासून तयारी सुरू केली असल्याने या निवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व होते; मात्र आता शिवसेनाच दोन गटात विभागली गेली असल्याने कोणता गट या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज दाखल केले जाणार असून ५ डिसेंबरला छाननी तर ७ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम असणार आहे. १८ डिसेंबरला आवश्यक त्या ठिकाणी निवडणूक होणार असून २० डिसेंबरला निकाल घोषित केला जाणार आहे.
ग्रामपंचायत व सरपंचनिहाय आरक्षण असे ः आगरवायंगणी (सर्वसाधारण), आपटी (सर्वसाधारण महिला), उसगांव (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), उंबरशेत (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), उंबर्ले (सर्वसाधारण), करजगाव (अनुसूचित जमाती), कळंबट (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), कादिवली (सर्वसाधारण), कुडावळे (सर्वसाधारण), करंजाणी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), कोळबांद्रे (सर्वसाधारण), जालगाव (सर्वसाधारण), दमामे (सर्वसाधारण स्त्री), देगांव (सर्वसाधारण स्त्री), देहेण (सर्वसाधारण स्त्री), टाळसुरे (सर्वसाधारण स्त्री), पाचवली (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), बोंडीवली (सर्वसाधारण), भडवळे (सर्वसाधारण स्त्री), मुर्डी (सर्वसाधारण स्त्री), वाझंळोली (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), वेळवी (सर्वसाधारण), विरसई (सर्वसाधारण स्त्री), शिर्दे (सर्वसाधारण), शिरसाडी (अनुसूचित जाती), सडवे (सर्वसाधारण) सातेरेतर्फे नातू (सर्वसाधारण), सारंग (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), सोवेली (सर्वसाधारण), हातीप (सर्वसाधारण स्त्री).