शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी कोकण दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी कोकण दौरा
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी कोकण दौरा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी कोकण दौरा

sakal_logo
By

swt1014.jpg
61522
सावंतवाडीः महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष वेणुनाथ कडू यांचे स्वागत करताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी.

शिक्षकांच्या प्रलंबित
प्रश्नांसाठी कोकण दौरा
वेणुनाथ कडू ः आगामी काळात प्रामाणिक प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या अभ्यासपूर्ण रीतीने सोडविण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारीच व्यक्ती अर्थात शिक्षक आमदाराची गरज आहे. यासाठी आगामी निवडणुकीत शिक्षक परिषद प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. त्यासाठी कोकण दौऱ्याचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अनेक शिक्षकांनी विद्यमान आमदार आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल रोष व्यक्त केला आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी कडू पुढे म्हणाले, "गेल्या सहा वर्षांत कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे अनेकदा केवळ अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला नसल्यामुळेच हे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांची सुद्धा सोडवणूक होऊ शकली नाही. गेल्या सहा वर्षांत विनाअनुदानितचे प्रश्न तसेच नियमित मान्यता व शालार्थ आयडी या समस्यांना सोडविण्यासाठी सामान्य शिक्षकांना अनेकदा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. शैक्षणिक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आगामी काळात हे सर्व चित्र बदलण्यासाठी सज्ज आहे." यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र माणगावकर, सलीम तकिलदार, एस. एम. सांगळे, वाय. पी. नाईक, एस. आर. मांगले, एन. पी. मानकर, विलास कासकर, भरत केसरकर, प्रवीण सानप, एस. पी. कुळकर्णी उपस्थित होते.
...............