ऑनलाईन प्रवेश अर्जास मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन प्रवेश अर्जास मुदतवाढ
ऑनलाईन प्रवेश अर्जास मुदतवाढ

ऑनलाईन प्रवेश अर्जास मुदतवाढ

sakal_logo
By

ऑनलाईन प्रवेश
अर्जास मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्र. सचिव माणिक बागर (महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे) यांनी दिली आहे.
२१ ला रात्री ११.५९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी, २३ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद संपर्क केंद्रशाळेमध्ये जमा करणे. २५ पर्यंत संपर्क केंद्रशाळांनी विद्यार्थ्याचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे. नमूद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या पाचवी व आठवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाचा वापर करावा. याबाबतच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
...............
''गुणपडताळणीसाठी
ऑनलाईन अर्ज करा''
सिंधुदुर्गनगरी, ता. १० : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलैला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित केला आहे. शाळांना तसेच पालकांना लॉगीनमधून विद्यार्थ्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये १७ पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. विहित मुदतीत ऑनलाईन गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांनी दिली.
...............