चिपळूण-चिपळूण बसस्थानकाच्या कामाला अखेर मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-चिपळूण बसस्थानकाच्या कामाला अखेर मुहूर्त
चिपळूण-चिपळूण बसस्थानकाच्या कामाला अखेर मुहूर्त

चिपळूण-चिपळूण बसस्थानकाच्या कामाला अखेर मुहूर्त

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl११०५.jpg ः चिपळूण ः बसस्थानकात नव्या इमारतीसाठी जेसीबीद्वारे करण्यात येणारी साफसफाई.
------------------

चिपळूण बसस्थानकाच्या कामाला अखेर मुहूर्त

स्वच्छतेला सुरवात ; ठेकेदाराकडे नाही इमारत आराखडा

चिपळूण, ता. १० ः गेल्या सहा वर्षापासून रखडलेल्या चिपळूण हायटेक एसटी बसस्थानकाच्या कामाला आता मुहूर्त मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात बांधकाम ठिकाणी स्वच्छता करत प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात केली जाणार आहे. दरम्यान, सातारा येथील संबंधित ठेकेदाराला चार महिन्यापूर्वी कामाचे आदेश बजावले असले तरी त्यांना इमारत बांधकामाचा आराखडा अद्यापही देण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेत बसस्थानकाच्या इमारतीविषयी इशारा दिला होता. १५ दिवसात प्रत्यक्ष बांधकामास सुरवात न झाल्यास ठेका रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. कामाचे आदेश देऊन ४ महिने झाले तरी प्रत्यक्ष कामाला सुरवात नसल्याची टीका केली होती. दरम्यान, गुरुवारी सकाळी ठेकेदार कंपनीने बसस्थानक परिसरात बांधकामस्थळी जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता करण्यास सुरवात केली. झाडेझुडपांनी हा परिसर वेढला होता. त्यामुळे ती काढण्याचे काम सुरू होते. दीर्घकाळानंतर कामाला सुरवात होत असल्याने आगारातील चालक, वाहक आणि प्रवासी मात्र सुखावले होते. एकतर स्थानकात लोकांना उभे राहायला पुरेशी जागा नाही. पाऊस व उन्हाळ्यात प्रवाशांना तिष्ठत राहावे लागते. त्यामुळे काय ते एकदा इमारतीचे काम पूर्ण करा, काम सुरू झाल्यावर पुन्हा विघ्ने येऊ नयेत, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात होती.
अखेर उशिरा का होईना हायटेक बसस्थानक इमारतीचे काम सुरू झाले. इमारतीचा प्लॅन ठेकेदाराला मिळालेला नाही. आर्किटेक्ट व अभियंत्यांच्या सल्ल्यानुसार बांधकामाला सुरवात केली जाणार आहे. या कामी सातत्य ठेवावे, अशी मागणी होत आहे.

चौकट
सहा वर्षे कामे रखडली
या हायटेक बसस्थानकासाठी ३ कोटी ८० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते धुमधडाक्यात प्रकल्पांचा आरंभ झाला होता. त्याला ६ वर्षे उलटली तरी प्रकल्पाचा पाया तयार झाला नव्हता. कामातील लोखंडदेखील आता गंजून गेले. गेल्या ५ वर्षात या विषयी अनेकांनी निवेदने दिली, आंदोलने केली; परंतु त्याला गती मिळाली नव्हती. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आवाज उठवला. अॅड. ओवेस पेचकर यांनीही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.