पावस ः अंगावर माती, दगड पडल्याने कामगार ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस ः अंगावर माती, दगड पडल्याने कामगार ठार
पावस ः अंगावर माती, दगड पडल्याने कामगार ठार

पावस ः अंगावर माती, दगड पडल्याने कामगार ठार

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१०p१८.jpg ः KOP२२L६१५१६ विनायक चंदुरकर
----------

अंगावर माती, दगड पडल्याने
गावखडी येथे कामगार ठार
पावस, ता. १० ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे चौथऱ्याचा चर खणत असताना, मेर्वी, जांभूळआड येथील गवंडीकाम करणाऱ्या विनायक शंकर चंदुरकर (वय ३५) याच्या अंगावर माती व दगड पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुंबईमध्ये राहणारे अभिषेक सत्यवंत तोडणकर यांनी आपल्या गावखडी येथील घराच्या चौथऱ्याचे काम गवंड्यांना दिले होते. त्या कामाकरिता मेर्वी-जांभूळआड येथील विनायक चंदुरकर ८ नोव्हेंबरला सकाळी ९ वा. तोडणकर यांच्या गावखडी येथील मूळ घराच्या चौथऱ्याचे चर खोदण्याचे काम करण्यासाठी गेले होते. चौथर्‍याचा चर खोदून वाळूमिश्रित माती घमेल्याने बाहेर काढण्याचे काम चालू होते. सायंकाळी चारच्या सुमारास सदर चौथऱ्यामधून खोदून आलेली वाळू दगडमिश्रित माती फावड्याने घमेल्यामध्ये भरून चंदुरकर बाहेर काढत होते. चरामध्ये उतरून अंदाजे साडेचार फूट खोदाई झाल्यानंतर अचानकपणे दगड मातीचा थर अंगावर येऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हे लक्षात येताच तातडीने त्याच्यासोबत गवंडीकाम करणारे कामगार यांनी खासगी वाहनातून त्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने साडेपाच वाजता मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. याबाबत त्याच्यासोबत काम करणारे दीपक पांडुरंग भोसले यांनी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये घटनेच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.