तरुणीवर अत्याचार, संशयितास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणीवर अत्याचार, संशयितास अटक
तरुणीवर अत्याचार, संशयितास अटक

तरुणीवर अत्याचार, संशयितास अटक

sakal_logo
By

(पान ३ साठी)

तरुणीवर अत्याचार, संशयितास अटक

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः तरुणीच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन तिला कामाला ठेण्याचे आणि कुटुंबालाही सांभाळण्याचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात हा प्रकार घडला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये हा प्रकार घडल्याची तक्रार पडितेने दिली. नरेश विठोबा जाधव (वय ४४.रा. बौद्धवाडी-सोमेश्वर, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की ही घटना मागील आठ ते नऊ महिने ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घडली आहे. संशयित नरेश जाधव याने एका तरुणीशी ओळख वाढवली. त्यानंतर तो काही ना काही कामानिमित्त तिच्या घरी जाऊ लागला. मुलीच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन मुलीला माझ्याकडे कामाला पाठवा, मी तुम्हाला चांगले पैसे देईन, तुमचा घरचा सगळा खर्च बघेन, असा विश्वास दिला. तरुणीच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन तिला कामाला ये म्हणून त्रास देऊ लागला. तरुणी नाही म्हणत असतानाही गावी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिला मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या नातेवाईकांना मारहाण, शिवीगाळ केली असे पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. बुधवारी (ता. ९) रात्री उशिरा ही तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली आडकूर तपास करत आहेत. संशयिताला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.