लांजा-लांज्यातील 15 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-लांज्यातील 15 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड
लांजा-लांज्यातील 15 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड

लांजा-लांज्यातील 15 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड

sakal_logo
By

लांज्यातील १५ ग्रामपंचायतींच्या
उपसरपंचांची निवड जाहीर

लांजा, ता. १० ः तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून निवडून आलेल्या सर्व उपसरपंचपदांचा निकाल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे.
तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाची निवडणूक १६ ऑक्टोबरला झाली होती. सरपंचपदासह सदस्यांची निवड झाल्यानंतर १५ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच थेट निवडून आला असला तरी त्याखालील सदस्य हे विरोधी पक्षाचे निवडून आल्याने उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये चुरस पाहावयास मिळाली.
१५ ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेले उपसरपंच असे ः मोहन जाधव- वेरवली बुद्रुक, दीपक ब्रिद- प्रभानवल्ली, राजेश झोरे-गोविळ, अहमद अब्दुल रहमान साठविलकर-कोर्ले, स्वप्नील जाधव- व्हेळ, पांडुरंग पेडणेकर- रिंगणे, संजय नवाथे- हर्चे, मनीषा पाष्टे- झापडे,
सुनील नाटेकर- कोंड्ये, सूर्यकांत मोहिते- गवाणे, महेंद्र कुंभार- कोलधे, रामचंद्र डाफळे- कोचरी, गोपीनाथ कुळये- शिरवली, हे १३ उपसरपंच बिनविरोध निवडून झाले. उपळे या ठिकाणी सातविरुद्ध दोन अशा मताने आत्माराम धुमक हे तर देवधे ग्रामपंचायतीमध्ये संजय मणचेकर हे सातविरुद्ध तीन मतांनी विजयी झाले.