चिपळूण ः अग्निशमन बंबामुळे 44 लाख खर्चावर प्रश्नचिन्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः अग्निशमन बंबामुळे 44 लाख खर्चावर प्रश्नचिन्ह
चिपळूण ः अग्निशमन बंबामुळे 44 लाख खर्चावर प्रश्नचिन्ह

चिपळूण ः अग्निशमन बंबामुळे 44 लाख खर्चावर प्रश्नचिन्ह

sakal_logo
By

पान तीन

rat१०p२८.jpg
६१५७०
ःKOP२२L६१५७०

चिपळूण ःअग्निशमन बंबावर दोन पोर्टेबल पंप बसवले

अग्निशमन बंबामुळे ४४ लाख खर्चावर प्रश्नचिन्ह

चिपळूण पालिका ; मुख्य पंप बिघडल्याने दोन पोर्टेबल पंप
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः येथील नगर पालिकेने ३ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या अत्याधुनिक अग्निशमन बंबाच्या मुख्य पंपात बिघाड झाला आहे. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून या बंबाला दोन पोर्टेबल पंप बसवण्यात आले आहेत. जोपर्यंत मुख्य पंपातील पीटीओची यंत्रणा दुरुस्त होत नाही तोपर्यंत या दोन पोर्टेबल पंपांवर वेळ मारून न्यावी लागणार आहे.
चार वर्षांच्या कालावधीत कोट्यवधीची कामे केली. काही कामांबाबत धाडसी निर्णय घेतले गेले. ग्रॅव्हिटी पाणीयोजना, भुयारी गटार योजना, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, अत्याधुनिक अग्निशमन बंब अशा कामांमध्ये नगर पालिका अधिनियम ५८(२) च्या आधारे धोरणात्मक निर्णय घेतले. यात सुमारे ४४ लाख रुपये खर्चातून खरेदी केलेला अत्याधुनिक अग्निशमन बंबही तितकाच वादग्रस्त बनला होता. इंदौरहून हा बंब पुरवण्यात आला होता; मात्र आता या बंबाच्या मुख्य पंपात बिघाड झाल्याने त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने तात्पुरता उपाय म्हणून चक्क अग्निशमन बंबावर दोन पोर्टेबल स्वरूपाचे पंप बसवले आहेत. त्या द्वारेच आग विझवण्याचे काम केले जात आहे.
चिपळूण शहरातील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा अंदाज घेऊन या बंबाची मागणी करण्यात आली होती. तसेच चिपळूण शहरापासून काही अंतरावर खेर्डी व खडपोली औद्योगिक वसाहत, लोटे औद्योगिक वसाहतीसाठी या बंबाचा नेहमी उपयोग होतो तर कधी कधी खेड, संगमेश्वर येथील एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत चिपळूण नगर पालिकेच्या बंबाचा आधार घेतला जातो; मात्र आता अग्निशमन बंबाच्या मुख्य पंपातच बिघाड झाल्याने त्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यातच जुन्या अग्निशमन बंबावरही ताण येण्याची शक्यता आहे. या पंपाच्या दुरुस्तीसाठी अग्निशमन दलाने स्थानिक पातळीवर प्रयत्न केले; मात्र कोल्हापूर, पुणे येथे पंप दुरुस्तीसाठी न्यावे लागणार असल्याने नाइलाजाने हा नवा प्रयोग केल्याची माहिती पुढे येत आहे.

कोट
अग्निशमन बंबाच्या मुख्य पंपातील पाणी दाबाने उडवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या पीटीओ यंत्रणेत बिघाड झाला आहे. दुरुस्तीसाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले; परंतु कुठेही यश आले नाही. त्यासाठी कोल्हापूर, पुणे येथे पंप न्यावा लागणार आहे. तात्पुरता उपाय म्हणून दोन पोर्टेबल पंप जोडले असून त्याने त्याच पद्धतीने काम सुरू आहे.

- महेश साळवी, अग्निशमन दल विभागप्रमुख