राज्यात 25 हजार उद्योजक निर्मितीसाठी 550 कोटीची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात 25 हजार उद्योजक निर्मितीसाठी 550 कोटीची
राज्यात 25 हजार उद्योजक निर्मितीसाठी 550 कोटीची

राज्यात 25 हजार उद्योजक निर्मितीसाठी 550 कोटीची

sakal_logo
By

(पान १ साठी)
(टीप- अन्य आवृत्तींना वापरता येईल. )

फोटो ओळी
-rat१०p३१.jpg
६१५९६
ःउदय सामंत

राज्यात २५ हजार उद्योजक निर्मितीसाठी ५५० कोटी

उदय सामंत; मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम सहकार बॅंकांमध्येही
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १० ः नव उद्योजकांना उभारी देण्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांबरोबर आता राज्यातील १४ सहकारी बॅंकांमध्येही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवण्याचा महत्वाचा निर्णय उद्योग मंत्रालयाने घेतला आहे. यातून १० ते २० लाखापर्यंत कर्ज दिले जाणार असून ग्रामीण भागात ३५ तर शहरी भागात २५ टक्के सबसीडी मिळणार आहे. ओबीसी, विमुक्त भटक्या जमाती आणि अल्पसंख्यांकासाठी ही योजना आहे. भविष्यात आर्थिक दुर्बल घटकांचाही यामध्ये समावेश होणार आहे. महाराष्ट्रातील २५ हजार उद्योजक निर्माण करण्यासाठी ५५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यवर्ती बॅंकेचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
ऑनलाइन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून नवउद्योजक निर्माण व्हावेत यासाठी शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे; परंतु, नवउद्योजकांना कर्जासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये योग्य वागणूक मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. काही तरुणांनी तर बॅंका आमची हॅरॅसमेंट (मानसिक त्रास) करत आहेत, असे सांगितले. म्हणून आम्ही महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आता राज्यातील १४ सहकारी बॅंकांमध्येही राबवण्यात येणार आहे. राज्यात नवउद्योजक निर्माण व्हावेत, त्यांना उभारी देण्यासाठी उद्योग मंत्रालयाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यवर्ती बॅंकेसह ठाणे, रायगड, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला आणि भंडारा या १४ बॅंकांमध्ये आता हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम आहे. इतर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या जाती आणि अल्पसंख्यांकांना समावेश केले आहे. केंद्राने जो आर्थिक दुर्बल घटकाचा निर्णय घेतला आहे. तो डोळ्यासमोर आर्थिक दुर्बल घटकाला यामध्ये समावेश करता येणार आहे.

कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत

मुख्यमंत्र्यांनी राज्यात अनेक जिल्ह्यांचा दौरा केला आहे; परंतु रत्नागिरी जिल्ह्यात कधी येणार, या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरीतील तीन कामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी येणार आहेत. डिसेंबर महिन्यात त्यांचा दौरा होईल. ठाकरे तारांगणाचे उद्घाटन, शासकीय इमारत आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालयाचे भूमिपूजन करतील, असे भरगच्च कार्यक्रम असतील.


नवीन उद्योगांसाठी लॅण्डबॅंक वाढवणार -

जिल्ह्यातील एमआयडीसीमधील आढावा घेतला. यामध्ये लोटे, रत्नागिरी एमआयडीसीतील जमीन नवीन उद्योजकांसाठी शिल्लक नाही. नवीन एमआयडीसी निर्माण करणे आता महत्वाचा भाग आहे. जिल्ह्यातील ३२ टक्के कंपन्या बंद आहेत. त्यांचे प्लॉट परत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोटेमध्ये एमआयडीसीतल दीड हजार एकर जमीन वाटप शिल्लक आहे. लॅण्ड बॅंक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.