रत्नागिरी ः दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा मृत्यू
रत्नागिरी ः दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी ः दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

पान 3 साठी

दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा मृत्यू
रत्नागिरी, ता. १० ः शहरातील टीआरपी येथे घरी जाताना दुचाकीवरून पडलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी (ता. १०) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. आरती गणेश जाधव (वय ५९, रा. बौद्धवाडी-ओरी, सध्या ः टीआरपी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ९) रात्री साडेदहाच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सिद्धेश विठ्ठल मटकर (वय २४, रा. पेंडखळे, ता. राजापूर, सध्या ः शिवाजीनगर, रत्नागिरी) हे दुचाकी (एमएच-०८-एफ-८३८१) सोबत मृत आरती जाधव यांना दुचाकीच्या मागे बसवून घेऊन टीआरपी येथे त्यांच्या घरी जात असताना आरती जाधव या दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. गुरुवारी (ता. १०) सकाळी नऊच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.