रत्नागिरी ः खून प्रकरणी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः खून प्रकरणी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता
रत्नागिरी ः खून प्रकरणी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी ः खून प्रकरणी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता

sakal_logo
By

चालत्या गाडीत खून प्रकरणी दोघे निर्दोष
आर्थिक व्यवहाराचे कारण ;गोळी घातल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः आर्थिक व्यवहारातून चालत्या गाडीत गोळीबार करत खून केल्या प्रकरणातील दोन संशयित आरोपींची न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. ही घटना ६ जानेवारी २०१९ला रात्री साडेनऊच्या सुमारास अल्ट्राटेक कंपनीसमोरील रस्त्यावर घडली होती.
किरण मल्लिकार्जुन पंचकट्टी (रा. गुलबर्गा, कर्नाटक) आणि त्याचा साथीदार लक्ष्मण कनटप्पा शिंदे (रा. सोलापूर) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांनाही दत्ताराम बलभिम क्षेत्री (रा. झाडगाव एमआयडीसी, रत्नागिरी) याचा खून केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली होती. किरण हा कर्नाटक येथे एकावर वार करून पळून रत्नागिरीत दत्ताराम क्षेत्रीकडे येऊन राहात होता. तेव्हा क्षेत्रीने किरणला मुद्रालोनमधून ९ लाखांचे कर्ज काढून व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता. त्यातील ३ लाख किरणने दत्ताराम क्षेत्रीला व्याजाने देऊन उर्वरित ६ लाखांचा व्यवसाय सुरू केला होता. कालांतराने किरण हा क्षेत्रीकडे व्याजाची वारंवार मागणी करू लागला; परंतु त्याचा राग आल्याने क्षेत्रीने किरणला व्याज देण्यास नकार देत त्याला मारहाणही केली होती. याचा राग मनात धरून किरणने क्षेत्रीच्या ऑफिसमधील त्याचेच पिस्तुल चोरून लक्ष्मणसोबत संगनमत करून दत्ताराम क्षेत्रीला मारण्याचा कट रचला. त्याप्रमाणे ६ जानेवारी २०१९ ला दत्ताराम क्षेत्री मोटार (एमएच-०८-एपी-२०९७) मधून घरी जात असताना शेट्ये नगर स्टॉपजवळ किरणने क्षेत्रीला हात दाखवून गाडी थांबवली. त्यानंतर गाडीच्या मागील सीटवर बसल्यानंतर किरण चालत्या गाडीत क्षेत्रीच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळी झाडली. त्यानंतर गाडी अल्ट्राटेक कंपनीच्या गेटच्या कंपाउंडवर आदळल्यानंतर किरणने गाडीतून पळ काढून लक्ष्मणला फोन करून बोलावून घेत त्याच्याकडे गुन्ह्यातील पिस्तुल दिले होते. लक्ष्मणने ते पिस्तुल तो सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असलेल्या ठिकाणी पालापाचोळ्यात लपवून ठेवत किरणला मदत केली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्यावर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणी आरोपींच्यावतीने अ‍ॅड. नेने यांनी केलेला युक्तिवाद आणि संशयाचा फायदा मिळाल्याने दोन्ही संशयित आरोपींची सबळ पुराव्याअभावी जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी निर्दोष मुक्तता केली.