खड्ड्यांची मलमपट्टी भाजपने रोखली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यांची मलमपट्टी भाजपने रोखली
खड्ड्यांची मलमपट्टी भाजपने रोखली

खड्ड्यांची मलमपट्टी भाजपने रोखली

sakal_logo
By

swt१०३७.jpg
६१६०३
वैभववाडीः तळेरे - गगनबावडा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम भाजप पदाधिकाऱ्यांनी रोखले. तत्पूर्वी कामाची तपासणी केली.

खड्ड्यांची मलमपट्टी भाजपने रोखली
तळेरे-वैभववाडी महामार्गः निकृष्ट कामाचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १०ः तळेरे-वैभववाडी महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम आज संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी रोखले. निकृष्ट पध्दतीने काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचारी वर्गाला धारेवर धरत, जोपर्यंत महामार्ग प्रधिकरणचा अधिकारी येत नाही, तोपर्यंत काम सुरू करू नये, असा इशारा दिला.
तळेरे-गगनबावडा महामार्ग खड्ड्यांमुळे वाहतुकीस अयोग्य बनला आहे. हे खड्डे डांबराने बुजविण्यात यावेत, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून वाहनचालकांमधून केली जात होती. दरम्यान, करुळ घाटरस्त्याची पाहणी आमदार नीतेश राणे यांनी केल्यानंतर ४८ तासांत खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानंतर काहींनी महामार्गाला उपअभियंता अतुल शिवनिवार यांना जबाबदार धरीत त्यांच्या नावाची फलक लावली होती. तळेरे-वैभववाडी मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी १८ लाख ४५ हजार इतकी रक्कम मंजूर असून या कामाला दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. हे काम आज सकाळपासून रेल्वे फाटकानजीकच्या पेट्रोलपंपासमोर सुरू होते.
खड्ड्यांतील माती न काढताच हे खड्डे बुजविले जात आहेत. याशिवाय डांबराचा वापर देखील अल्प प्रमाणात केला जात असल्याचे आज सकाळी सर्वप्रथम बँकेचे माजी संचालक गुलाबराव चव्हाण यांच्या निर्दशनास आले. त्यांनी तत्काळ कामात सुधारणा करा, असे सांगितले. तरीदेखील त्याच पध्दतीने काम सुरू होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी उपसभापती दिगबंर मांजरेकर, कोकिसरे सरपंच अतुल नारकर, गिरीधर रावराणे, राजाराम गडकर आदी खड्डे बुजवित असलेल्या कामाच्या ठिकाणी पोहाचले. तेथे सुरू असलेले काम पाहुन ते संतप्त झाले.
खड्ड्यांतील माती न काढताच खड्डे बुजवून राहतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. खड्डे भरताना डांबराचा देखील कमी प्रमाणात वापर झाल्याचे निर्दशनास आल्याने रस्त्यांची दुरवस्था अधिकाऱ्यांमुळे झाली असून बदनामी मात्र पक्षांची बदनामी होत आहे. निकृष्ट काम होऊ देणार नाही, असे सांगत तत्काळ काम बंद करण्यास सांगितले. त्यानंतर काम बंद करण्यात आले.

चौकट
अन्यथा काठीने झोडून काढेन
तळेरे-गगनबावडा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ऊस तोडणी लांबली आहे. असे असताना मंजूर झालेले काम निकृष्ट करीत असाल तर काठीने झोडून काढेन, असा इशारा जिल्हा बँकेचे माजी संचालक गुलाबराव चव्हाण यांनी खड्डे बुजविणाऱ्या कामगारांना दिला.

कोट
नादुरुस्त तळेरे-गगनबावडा महामार्गामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. खड्डे बुजविण्याची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने करीत आहोत. तर मंजूर झालेले काम ठेकेदार निकृष्ट करीत आहेत. हे खड्डे टिकणार नाहीत. त्यामुळे काम रोखले आहे. अधिकाऱ्यांच्या समक्षच हे काम झाले पाहिजे.
- नासीर काझी, तालुकाध्यक्ष, भाजप