पान एक-किनारपट्टीच्या पर्यटन वापराचा प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-किनारपट्टीच्या पर्यटन वापराचा प्रस्ताव
पान एक-किनारपट्टीच्या पर्यटन वापराचा प्रस्ताव

पान एक-किनारपट्टीच्या पर्यटन वापराचा प्रस्ताव

sakal_logo
By

61607
12653

पान एक

टीपः swt1042.jpg मध्ये फोटो आहे.


किनारपट्टीच्या विकासातून उत्पन्नात वाढ करणार
तारकर्लीत उच्चस्तरीय बैठकीत नियोजन; सात राज्यांतील अधिकाऱ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः राज्याला लाभलेल्या निसर्गरम्य सागरी किनारपट्टीचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने वापर करून राज्याच्या आणि देशाच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रस्ताव तारकर्ली येथे झालेल्या महाराष्ट्रासह सात राज्यांच्या उच्चस्तरीय नियोजन व अर्थ विभागातील अधिकाऱ्‍यांच्या दोनदिवसीय चर्चासत्रात मांडला आहे. हे अधिवेशन राज्याच्या अर्थ व सांख्यिकी विभागाने आयोजित केले होते. महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व लडाख या सात राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज (GSDP & DDP) परिगणनासंदर्भात केंद्राच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार यांच्या सूचनांनुसार व राज्याच्या नियोजन विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व लडाख या सात राज्यांचे दोन दिवसीय चर्चासत्र काल (ता. ९) व आज एमटीडीसी तारकर्ली येथे झाले. याची सांगता आज झाली. कार्यशाळेस महाराष्ट्रासह सहा राज्यांचे अधिकारी उपस्थित होते. हिमाचल प्रदेशचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. हे चर्चासत्र राज्याचे अर्थ व सांख्यिकी संचालनालय संचालक विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी राजस्थान सरकारचे अर्थ व सांख्यिकी संचालनालय डॉ. ओमप्रकाश भैरवा प्रमुख पाहुणे होते. हरियाणा व लडाख राज्यांचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक अनुक्रमे डॉ. राजवीर भारद्वाज व अब्दुल खलिक भट्टी उपस्थित होते. याशिवाय चर्चासत्रात कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विभाग प्रोफेसर डॉ. ज्ञानदेव तळुले आणि पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेचे प्रोफेसर डॉ. काकली मुखोपाध्याय यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राच्या माध्यामातून विषयावरील सखोल अभ्यासपूर्ण चर्चा व सांख्यिकीय माहितीचे आदानप्रदान केले.
तारकर्ली येथील सृष्टीसौंदर्याबाबत या नॉन कोस्टल राज्यांच्या प्रतिनिधींनी याबाबतचे प्रमोशन करण्याबाबत सुचविले. महाराष्ट्र राज्याला सुमारे ७२० किलोमीटर अंतराचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सागरी किनाऱ्यावर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे वसलेले आहेत. इतर नॉन कोस्टल राज्यातील पर्यटकांना सागरी समुद्र पर्यटनाचे मोठे आकर्षण असते. त्याअनुषंगाने महाराष्ट्रातील सागरी पर्यटनाची मोठ्या प्रमाणात व विविध माध्यमातून माहिती व जाहिरात झाल्यास त्याद्वारे इतर नॉन कोस्टल राज्यातील पर्यटक आकर्षित होऊन सागरी पर्यटनाकडे त्यांचा ओघ वाढेल. सागरी पर्यटनाबाबत आपणास अधिक व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करून त्याअनुषंगाने राज्याची डायनॅमिक पॉलिसी तयार करून राबविण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत.

सागरी पर्यटनाचे आकर्षण
समुद्राद्वारे होणारी इकॉनॉमिक हालचालीबरोबरच राज्यातील सागरी किनारे व सृष्टीसौंदर्य यामुळे पर्यटन क्षेत्रास चालना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटकांना सागरी पर्यटन आकर्षित करते. पर्यटनाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात राज्य उत्पन्नाचा निश्चित मोठ्या प्रमाणात हिस्सा आहे. राज्य उत्पन्नात सागरी पर्यटनाचा हिस्सा अधिकाधिक वाढविण्यात मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाल्यास निश्चितच राज्याचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीपर्यंत पोहोचण्याचे ध्येय गाठण्यास मदत होऊ शकते, अशी चर्चा झाली.